Jump to content

पहिली बौद्ध संगीती

सप्तपर्णी लेणी राजगीर, येथे पहिली बौद्ध संगीती झाली होती.

पहिली बौद्ध संगीती किंवा पहिली बौद्ध परिषद इ.स.पू. ४८७ मध्ये अजातशत्रू राजाच्या आश्रयाने व महाकश्यक भिक्खूच्या अध्यक्षतेखाली राजगृह येथे भरली होती. बुद्धांच्या निर्वाणानंतर बौद्ध भिक्खू व भिक्खुणींसाठी विनय अथवा वर्तणुकीचे नियम करणे आवश्यक होते. यास्तव भगवान बुद्धांची शिकवण, वक्तव्ये व उपदेश यांचे एकत्रीकरण करून नियम निर्मितीसाठी ही पहिली बौद्ध परिषद महाकश्यप, नामक बौद्ध ज्ञानियाने बोलाविली. सभेला फार मोठा शिष्यवृंद जमला होता. बौद्ध धम्म नियमांविषयी सभेत वादविवाद झाला आणि सुत्तपिटकविनयपिटक ह्या दोन धम्मग्रंथाची निर्मिती झाली. या कामी आनंद व उपाली या विद्वान भिक्खूंनी मोलाची मदत केली. नियमभंग करणाऱ्यास योग्य दंड ठरण्यात आला. हर्यंकवंशी मगधसम्राट अजातशत्रू (इ.स.पू. ४९३ - ४६२) याने ह्या सभेला सर्व प्रकारचे साहाय्य केले.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे