पहिला विल्हेल्म (जर्मन सम्राट)
विल्हेल्म पहिला | |
कार्यकाळ १८ जानेवारी १८७१ – ९ मार्च १८८८ | |
मागील | पदनिर्मिती |
---|---|
पुढील | फ्रीडरिश तिसरा |
कार्यकाळ २ जानेवारी १८६१ – ९ मार्च १८८८ | |
मागील | फ्रीडरिश विल्हेल्म चौथा |
पुढील | फ्रीडरिश तिसरा |
जन्म | २२ मार्च १७९७ बर्लिन, प्रशिया |
मृत्यू | ९ मार्च, १८८८ (वय ९०) बर्लिन |
वडील | फ्रीडरिश विल्हेल्म तिसरा |
सही |
विल्हेल्म पहिला (जर्मन: Wilhelm Friedrich Ludwig; २२ मार्च १७९७ - ९ मार्च १८८८) हा प्रशियाचा राजा व जर्मनीच्या एकत्रीकरणनंतर स्थापन झालेल्या जर्मन साम्राज्याचा पहिला सम्राट (Deutscher Kaiser) होता. १८७१ सालच्या फ्रान्स-प्रशिया युद्धामध्ये प्रशियाचा सपशेल विजय झाल्यानंतर १८ जानेवारी १८७१ रोजी फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात जर्मन साम्राज्याची निर्मिती झाली व विल्हेल्मला सम्राटाच्या गादीवर बसवण्यात आले.
पहिल्या विल्हेल्मने नियुक्त केलेला ओटो फॉन बिस्मार्क हा जर्मनीचा पहिला चान्सेलर जर्मन साम्राज्याला एक महासत्ता बनवण्यात कारणीभूत होता.