पहिला महम्मद सादतउल्लाखान
महम्मद सय्यद हा अर्काटचा तिसरा नवाब होता.[१] अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता. इ.स. १७१० साली बादशहा बहादूरशहाने त्याला सादत-उल्लाह-खान हा किताब देऊन त्याची अर्काटच्या नवाबपदी नेमणूक केली. दक्षिणेचा सुभेदार निजाम उल मुल्कने दिल्लीची सत्ता झुगारून दिली तेव्हा अर्काटचा नवाब असलेल्या सादतउल्लाखानानेही स्वतःचे स्वातंत्र्य जाहीर केले व दिल्ली आणि हैदराबादशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले. त्यामुळे अर्काटच्या या नवाबाला आकस्मिकपणे सार्वभौमत्व प्राप्त झाले.
सादतउल्लाखान इ.स. १७३२ साली मृत्यू पावला. त्याला मुलगा नव्हता परंतु त्याने त्याचा पुतण्या दोस्तअलीला स्वतःचा वारस म्हणून घोषित केलेले होते. सादतउल्लाखानाच्या मृत्यूनंतर त्याचा वारस म्हणून दोस्तअली अर्काटचा नवाब झाला.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "The Prince of Arcot" (इंग्रजी भाषेत). 2017-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य) वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
मागील: दाऊद खान | अर्काटचे नवाब इ.स. १७१० – इ.स. १७३२ | पुढील: अली दोस्त खान |