Jump to content

पहिला चामराज वोडेयार

पहिला चामराज वोडेयार
मैसुरुचा दुसरा राजा
अधिकारकाळ१४२३-१४५९
अधिकारारोहण१४२३
राज्याभिषेक१४२३
राजधानीमैसुरु
जन्म१४०८
मृत्यू१४५९
मैसुरु
पूर्वाधिकारीयदुराय वोडेयार
' पहिला तिम्मराज वोडेयार
उत्तराधिकारीपहिला तिम्मराज वोडेयार
वडीलयदुराय वोडेयार
संततीपहिला तिम्मराज वोडेयार
धर्महिंदू

चामराजा वोडेयार पहिला (बेट्टाडा चामराजा; १४०८ - १४५९) हा १४२३पासून मृत्यूपर्यंत मैसुरुचा दुसरा राजा होता. तो वडियार घराण्याचा यदुरायाचा मोठा मुलगा होता.

चामराज सत्तेवर आला तेव्हा यदुरायाने स्थापलेली जहागीर २४ वर्षे जुनी होती आणि विजयनगर साम्राज्याला आधीन होती. विजयनगरचे साम्राज्या या सुमारास भरभराटीत असले तरीही तेथील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत यदुरायानंतर चामराजाने मैसुरुच्या आसपासच्या वाड्या-वस्त्या आणि छोटी शहरे आपल्या जहागिरीत शामिल करून घेतली.

चामराजने, विजय बुक्का राय, देवराया दुसरा आणि मल्लिकार्जुन राया अशा तीन सम्राटांना आधीन राहून ३६ वर्षे राज्य केले. यदुराय आणि चामराजाच्या ६० वर्षांच्या सततच्या अंमलामुळे राज्याला स्थैर्य आले आणि विजयनगर साम्राज्याील एक समर्थ घटक बनले.