Jump to content

पहिला चंद्रगुप्त

चंद्रगुप्त पहिला हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे. चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले. चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो.[] चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली.

वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे. तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई. लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला. या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला. नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे. चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय.

मागील
घटोत्कच (गुप्त सम्राट)
गुप्त सम्राट
३२० - ३३५
पुढील
समुद्रगुप्त


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ R.C. Majumdar, History and Culture of the Indian People: The Classical Age, Chapter I, Bharatiya Vidya Bhavan,1954