पहाडी कोतवाल
पहाडी कोतवाल, लहान गोचा, धवळी बाणोली,काळपोट्या, घोश्या, धवलपोटी घोश्या, बांडोळा, बांडोळी, बारका बाणवा (इंग्लिश:Indian Whitebellied Drongo; हिंदी:घौरी भुजंगा, धपरी,पहाडी भुजंगा; संस्कृत:भारत सितोदर अंगारक, सितोदर अंगारक; गुजराती:धोळा पेटनो कोशी, सफेद पेटनो कोशी) हा एक पक्षी आहे
ओळख
आकाराने बुलबुलपेक्षा मोठा वरील भागाचा रंग निळा.पोट आणि शेपटीखालचा भाग पांढरा खोलवर दुभंगलेली लांब शेपटी नर-मादी दिसायला सारखे.
वितरण
जवळजवळ भारतभर श्रीलंका,२००० मीटर उंचीपर्यंत हिमालयाचा भाग.मार्च ते जून या काळात वीण.
निवासस्थाने
पानगळीची शुष्क आणि आर्द्र जंगले.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली