Jump to content

पश्चिम युरोपीय हवामान

पश्चिम युरोपीय हवामान हे मुख्यत्वे ४५ ते ५० ° अक्षांशावर समुद्रकिना‍ऱ्याजवळील भूप्रदेशात आढळून येते. इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, नेदरलँड्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, पोलंड या युरोपातील देशात, तसेच अमेरिकेतील पुर्वोत्तर राज्ये, कॅनडाचा पूर्व किनारा, दक्षिण गोलार्धातील न्यूझिलंड या देशात आढळून् येते.

या हवामान प्रकारचे वैशिट्य म्हणजे, बारामाही पाऊस, सौम्य ते कडक हिवाळा व सौम्य उन्हाळा हे आहे. या भूप्रदेशातील बहुतेक सर्व देश अतिश्रीमंत देशात गणले जातात.