पश्चिम बंगाल विधानसभा
पश्चिम बंगालची विधानसभा | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | पश्चिम बंगाल | ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
पश्चिम बंगाल विधानसभा (बंगाली: পশ্চিমবঙ্গ বিধানসভা) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. २९४ आमदारसंख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज कोलकाता शहरामधून चालते. तृणमूल काँग्रेस पक्षाचे बिमन भट्टाचार्य हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभेच्या नेत्या आहेत.
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे पश्चिम बंगाल विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे १४८ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १६वी विधानसभा २०१६ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. मागील निवडणुकीमध्ये प्रस्थापित केलेले आपले वर्चस्व तृणमूल काँग्रेसने कायम राखले.
सद्य विधानसभेची रचना
सरकार (210)
विरोधी पक्ष (83)
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (44)
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (25)
- क्रांतीकारी समाजवादी पक्ष (3)
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष (1)
- मार्क्सवादी फॉरवर्ड ब्लॉक (1)
- फॉरवर्ड ब्लॉक (2)
- भारतीय जनता पक्ष (3)
- गोरखा जनमुक्ती मोर्चा (3)
- अपक्ष (1)
- रिक्त (1)