Jump to content

पशुगोवंशाचा साज शृंगार

भारतीय गोवंशाचा साज शृंगार
भारतीय गोवंशाचा साज शृंगार

भारतात शेतीउपयुक्त गोवंशाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे वर्षातून एकदा येणारा 'बैलपोळा' सणाला बैलांची आणि दिवाळी मध्ये साजरा केला जाणारा 'वसूबारस' या दिवशी गाईची पूजा केली जाते. तर दीपावली पाडव्याला म्हैस आणि रेड्यांची मोठ्या भक्ती भावाने पुजा केली जाते. त्यांना वेगवेगळे "साज शृंगार" वापरून सजवले/तयार केले जाते. गावा-गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यांना गोड धोड नैवेद्य देखील या दिवशी केला जातो. याशिवाय इतर विशेष कार्यक्रमाला देखील त्यांची सजावट केली जाते. यातील काही सजावटीच्या वस्तू पुढीलप्रमाणे आहेत.[][][]

घुंगरु चाळ

या साजाचे वजन जास्त असल्यामुळे दैनंदिन वापरासाठी याचा वापर कमी केला जातो. हे खिल्लार बैलांनाच सणवार असेल तेव्हाच घातले जाते. तसेच बैलगाडीला बैल जुंपल्यानंतर देखील याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. बैलांच्या पायाच्या ठेक्यावर याचा सुंदर आवाज निर्माण होऊन, १ किलोमीटर पर्यंत जाईल एवढा मोठा आवाज येतो. हाताने विणून यामध्ये चामड्याची वादी, बेल्ट आणि घुंगरांचा वापर केलेला असतो. एक सर्वात मोठा घुंगरू आणि २० लहान घुंगरू वापरले जातात. वेगवेगळ्या साईझ मध्ये देखील हे उपलब्ध असतात.

रंगीत मण्यांची माळ

दैनंदिन रोजच्या वापरामध्ये याचा वापर गोपालक करतात. बैलांच्या तुलनेत गाईंच्या गळ्यामध्ये जास्त प्रमाणात घालतात. वजनाने हलके असून वेगवगळे रंगीत मणी यामध्ये वापरलेले असतात, त्यामुळे ते जास्त आकर्षक दिसतात. हाताने विणून तयार केला जाणारा हा साज आहे.

गोंड्याच्या पितळी शेंब्या

गाय किंवा बैलांच्या शिंगामध्ये याचा वापर करतात. यामध्ये वेगवगळे प्रकार देखील उपलब्ध असतात. पितळेच्या जागी अल्युमिनयमचा वापर देखील करतात. फक्त पितळी शेंब्याची किंमत जास्त असते. याला शिंगा मध्ये लावण्यासाठी चिकटपटीचा वापर केला जातो किंवा शिंगाला छोटेसे छिद्र करून देखील लावले जाते.

पितळी तोडे

या साजाचे वजन जास्त असल्यामुळे दैनंदिन वापरासाठी याचा वापर कमी केला जातो. हे खिल्लार बैलांनाच सणवार असेल तेव्हाच घातले जाते. याचे वजन घुंगरु चाळ पेक्षा जास्त असू शकते, त्यामुळे याची मीमात देखील जास्त असते.

घुंगराच्या चाळ

दररोजच्या वापरात हा साज वापरला जातो. सुंदर हातकामाने विणून तयार केला जाणारा साज म्हणून याची ओळख आहे. यांच्यामध्ये आवडीनुसार वेगवगळ्या रंगाच्या दोरीचा वापर केला जातो आणि यामध्ये वापरले जाणारे घुंगरू हे छोट्या आकाराचे ८० ते १०० वापरलेले असतात.

कवड्यांची माळ

गाय किंवा बैलांना नजर लागू नये म्ह्णून देखील या साजचा वापर केला जातो. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कवड्या अंदाझे १७० ते २०० या प्रमाणात वारल्या जातात. याचे वजन माध्यम असून ठराविक सणांना याचा वापर केला जातो.

शिंग दोर/दारकी

बैलांच्या किंवा गाईच्या दोन शिंगांच्या मध्ये एक वेगळी गाठ मारून हा साज गाई किंवा बैलांच्या कपाळावर आणून ठेवला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डर जवळील भागातील बैलांना जास्त प्रमाणात हा साज पाहायला मिळतो. गाई पेक्षा बैलांना जास्त प्रमाणात हा वापरला जातो.

गुडघ्याचे गंडे

बैलांच्या किंवा गाईच्या फक्त पुढच्या पायाला, गुडघ्यावरती हे गंडे बांधले जातात. दैनंदिन रोजच्या वापरामध्ये याचा वापर केला जात नाही.

मोरकी

खिल्लार गाई आणि बैलांना त्यांच्या नाकाभोवती आणि गळ्याभोवती बांधलेली दोरी असते, तिला मोरकी म्हणतात. याला विषेश पद्धतीने अशा २ गाठी बांधून, एका दोरी पासून तयार केलेली असते. याच्यामुळे खिल्लारला आणि इतर गोवंशाला हाताळणे जास्त सोपे जाते. दैनंदिन वापरात यांचा वापर सर्व शेतकरी करतात

वेसन

याचा मुख्यतः वापर हा खिल्लार बैलांना सर्वात जास्त केला जातो, काही प्रमाणात खिल्लार गाईंना देखील बांधले जाते. हे बांधण्यासाठी बैलाच्या किंवा गाईच्या नाकाच्या एका बिळातून दुसऱ्या बिळात छोटेसे छिद्र करून ही दोरी बांधली जाते. खिल्लार बैल आणि गाई या जास्त आक्रमक असतात, यासाठी त्यांना योग्य रीत्या हाताळता यावे यासाठी प्रामुख्याने याचा वापर केला जातो. खिल्लार गोवंश सोडून इतर गोवंशामध्ये जास्त वापर आपल्याला पाहायला मिळत नाही. पण बैल जास्त आक्रमक असेल तर त्याला वेसन हे घट्ट आणि नाकातील बीळ जर मोठे असेल तर वेसण देखील जाड दोरीची बांधावी लागते. यामध्ये जर नीट काळजी नाही घेतली तर बैलाचे नाक देखील काही प्रमाणात फाटू शकते.

जुंपणी

जोटयाला बैल जोडले राहावेत म्हणून त्यांच्या गळ्या भोवती चामड्याचा पट्टा किंवा दोरीच्या साहाय्याने बनवलेला पट्टा असतो, त्याला जुंपणी असे म्हणतात. यामुळे बैल हा बैलगाडीला ओढून नेऊ शकतो. जोपर्यंत जोटयाला बांधलेली गाठ सोडली जात नाही तो पर्यंत बैल हा बैलगाडीला धरूनच राहतो आणि ओढून नेण्याचे काम करतो.

पायातले चाळ

खिल्लार गाय किंवा बैलांना सणाच्या दिवशी आवर्जून शेतकरी आपल्या आवडत्या सर्जा-राजा जोडीला हे चाळ पायात घालत असतो. कापडाचा बेल्टचा वापर करून त्यावर लहान घुंगरू बांधलेले असतात. पायाच्या नख्याच्या वरती हे बांधले जातात.

आसुड

याचा वापर आसूड बनवण्यासाठी मुख्यतः केला जातो. याच्या एका बाजूला चामड्याची वादी किंवा नायलॉनची दोरी बांधली जाते आणि हे एकत्रित रीत्या लाकडाच्या काठीला बांधले जाते. यामध्ये वेगवेगळे आकारानुसार/गरजेनुसार उपलब्ध असतात. गाय/बैल, शेळी, म्हैस अश्या सर्व जनावरांच्या मागणीनुसार बनवला जातो.

डफळापूर कासरा

बैल किंवा गाईला दोनी बाजूने दावणीला बांधून किंवा चालवताना याचा वापर करतात. फक्त सणवार किंवा कोणत्या विशेष कार्यक्रमासाठीच याचा वापर केला जातो. वेगवेगळ्या भागात याचे वेगळेपण आपल्याला पाहायला मिळते. डफळापुर, ता. जत जि. सांगली या भागात विशेष करून या पद्धतीचे बनवले जातात आणि पाहायला मिळतात. यावरील विशेष अश्या नक्षी कामाचे विणकाम प[पाहायला मिळते, म्ह्णून याला डफळापूर कासरा म्हणतात. को जो फक्त त्या भागातच बनवला जातो.

कंबर पट्टा व पायांचा पट्टा

बैलांच्या किंवा गाईच्या कमरेभोवती (पुढच्या दोन पायांच्या आणि वशिंडाच्या बरोबर मागे) आणि फक्त पुढच्या पायांना गुडघ्याच्या वरती हा पट्टा बांधला जातो. यामध्ये शक्यतो वेगवगळे प्रकार आहेत. काही भागात यामध्ये जास्त प्रमाणात लोकरीचे गोंडे वापरले जातात. बैलपोळा आणि वसुबारस सारख्या सणांना खिल्लार गोवंशाला याचा वापर करून सजवले जाते.

गळयातले कंडा

सुंदर नक्षीकाम हाताने विणून बनवलेला हा साज असतो, हा बनवण्यासाठी जास्त कालावधी देखील लागतो. सर्वात मोठ्या मापाच्या खिल्लार बैलांना याचा वापर केलेला जास्त दिसून येतो, शक्यतो गाईंना हा वापरला जात नाही. जर कमी जाडीचा कंडा असेल तर तो खिल्लार गाईंना देखील वापरला जातो. यामध्ये एक पितळी कडी देखील असते, कि जेणेकरून गाय किंवा बैल कासऱ्याला बांधून ठेवता येहू शकतो. किंवा घंटी देखील त्यामध्ये बांधता येते. याची मागणी ही सर्वात जास्त असून महाग देखील आहे.

आसुड

याचा वापर शेती कामाला किंवा बैलगाडीला बैल जुंपल्या नंतर त्याने त्याची कामे जोरात करावी किंवा त्यांनी धाकात रहावे यासाठी इशारा देण्याचे काम यांच्यामार्फत केले जाते. वापर कमी प्रमाणात असला तरी शेतकरी आनंदाने त्याच्या खांद्यावर ठेवून बैलांबरोबर आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. घरामध्ये शोभेची वस्तू म्हणून देखील पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील काही कारागीर यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. कारण काही ३/४ प्रकारचे वेगळॆ पण असलेले आसूड जास्त प्रसिद्ध आहेत.

घुंगराच्या पितळी शेंब्या

गाई किंवा बैलांच्या शिंगाच्या टोकाला या पितळी शेम्बया बसवल्या जातात. याचा एक फायदा म्हणजे शिंगांच्या टोकांना इजा होण्यापासून रोखते. तसेच यामध्ये काही वेगवेगळे प्रकारचे देखील असतात. कि ज्यामध्ये घुंगरांचा वापर केलेले आणि काही नुसताच पितळी शेम्बया देखील पाहायला मिळतात.

गोडयांचा कासरा

यामध्ये लोकरीचे गोंडे, फुले आणि मोती यांचा वापर करून तयार केला जातो, यामध्ये मुख्य भागी सर्वात मोठा लोकरीचा गोंडा बसवलेला असतो, त्यामुळे याला गोडयांचा कासरा बोलतात. बैल किंवा गाईला दोन्ही बाजूने दावणीला बांधून किंवा चालवताना याचा वापर करतात. फक्त सणवार, जनावरांचे प्रदर्शन, मिरवणूक किंवा कोणत्या विशेष कार्यक्रमासाठीच याचा वापर केला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये सर्रास हे पाहायला मिळतात, कारण इतर कासऱ्यांच्या तुलनेत याची किंमत ही कमी असते.

रंगीत डफळापूर कासरा

सणवार, जनावरांचे प्रदर्शन, मिरवणूक किंवा कोणत्या विशेष कार्यक्रमासाठीच याचा वापर केला जातो. वेगवेगळ्या भागात याचे वेगळेपण आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये प्लास्टिकचे मोती, आणि वेगवगेळे रंग असलेले दोरे वापरले आहेत, कि ज्यामुळे याचा आकर्षक पणा जास्त दिसून येतो. दैनंदिन रोजच्या वापरामध्ये याचा वापर केला जात नाही. कारण याची किंमत देखील जास्त असते. डफळापुर, ता. जत जि. सांगली या भागात विशेष करून या पद्धतीचे बनवले जातात म्ह्णून याला डफळापूर कासरा म्हणतात. बैल किंवा गाईला दोन्ही बाजूने दावणीला बांधून किंवा चालवताना याचा वापर करतात.

साज शृंगाराचा तक्ता

[][][].[][]

नाव आणि माहिती चित्र
घुंगरु चाळ
रंगीत मण्यांची माळ
गोंड्याच्या पितळी शेंब्या
पितळी तोडे
घुंगराच्या चाळ
कवड्यांची माळ
शिंग दोर/दारकी
गुडघ्याचे गंडे
मोरकी
वेसन
जुंपणी
पायातले चाळ
आसुड
डफळापूर कासरा
कंबर पट्टा व पायांचा पट्टा
गळयातले कंडा
आसुड
घुंगराच्या पितळी शेंब्या
गोडयांचा कासरा
रंगीत डफळापूर कासरा

संदर्भ

  1. ^ "सर्जा-राजाचा सण 'बैलपोळा'..." २ जून २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b "बैल पोळा सण आला आठ दिवसांवर, बैलांचा साज विकणारे फिरतात गावोगावी..." 2021-06-02 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ जून २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम ?". २ जून २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "परभणीची बाजारपेठ : बैलांचे साजही जीएसटीच्या कचाट्यात". २ जून २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ Tinkhede, Shreya (30 August 2019). "Pola festivities endure even in urban milieu". Times Of India. २ जून २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ Edward Balfour (1885). The Cyclopædia of India and of Eastern and Southern Asia. B. Quaritch. p. 241.
  7. ^ Usha Sharma (2008). Festivals In Indian Society. Mittal Publications. p. 77. ISBN 978-81-8324-113-7.

बाह्य दुवे