पवनचक्की
पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती.
आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा शहराजवळील चाळकेवाडी येथे आहे. सातारा परिसरातही कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारल्या आहेत.