पलक मुछाल
पलक मुछाल | |
---|---|
पलक मुछाल | |
आयुष्य | |
जन्म | ३० मार्च, १९९२ |
जन्म स्थान | इंदूर, मध्य प्रदेश |
संगीत साधना | |
गायन प्रकार | पार्श्वगायिका, शास्त्रीय गायिका |
संगीत कारकीर्द | |
कारकिर्दीचा काळ | १९९७ - चालू |
पलक मुछाल ( ३० मार्च १९९२) ही एक भारतीय गायिका आहे. आपला भाऊ पलाश मुछालसोबत पलक भारतभर संगीताचे कार्यक्रम प्रस्तुत करते व त्यामधून मिळणारी रक्कम आर्थिक आधाराची गरज असलेल्या गरीब व हृदयविकाराचा आजार असलेल्या मुलांच्या इलाजावर खर्च करते.
मुछाल बॉलिवूडमध्ये देखील कार्यरत असून तिने एक था टायगर, आशिकी २, प्रेम रतन धन पायो इत्यादी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील पलक मुछाल चे पान (इंग्लिश मजकूर)