Jump to content

पर्वत

मॉंट ब्लॅंक हा आल्प्स पर्वतरांगेतील सर्वात उंच पर्वत आहे.
चित्र:K2, Mount Godwin Austen, Chogori, Savage Mountain.pdf
हिमालयामधील के२ पर्वत.

पर्वत हे नाव नैसर्गिकरित्या इतर भूस्तराहून उंच असलेल्या भौगोलिक रचनेसाठी वापरले जाते. समुद्रसपाटीपासून उंचीनुसार पर्वत डोंगरटेकडीपेक्षा उंच असतात. बरेचदा पर्वताचा माथा सपाट नसून सुळका अथवा शिखराच्या स्वरूपाचा असतो. तसेच बव्हंशी पर्वत एखाद्या पर्वतरांगेचा भाग असतात.

हिमालयामधील माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत असून त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ८,८४८ मी (२९,०२९ फूट) इतकी आहे २१,१७१ मी (६९,४५९ फूट) उंची असलेला मंगळ ग्रहावरील ऑलिंपस मॉन्स हा सूर्यमालेमधील सर्वात उंच पर्वत मानला जातो.

सर्वमान्य व्याख्यांनुसार पृथ्वीवरील २४ टक्के भूभाग पर्वतांनी व्यापला आहे. ह्यापैकी आशिया खंडात ६४ टक्के, युरोपा २५ टक्के, दक्षिण अमेरिका खंडात २३ टक्के ऑस्ट्रेलियामध्ये १७ टक्के तर आफ्रिकेत ३ टक्के जमिनीचा समावेश होतो.