परिनिर्वाण स्तूप
परिनिर्वाण स्तूप | |
---|---|
परिनिर्वाण स्तूप | |
The Parinirvana Temple with the Parinirvana Stupa, Kushinagar | |
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/India Uttar Pradesh" nor "Template:Location map India Uttar Pradesh" exists. | |
प्राथमिक माहिती | |
भौगोलिक गुणक | 26°44′28″N 83°53′17″E / 26.741°N 83.888°E |
देश | भारत |
संकेतस्थळ | kushinagar.nic.in |
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" | |
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" |
परिनिर्वाण स्तूप हा उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर येथील एक बौद्ध विहार आहे. हे ठिकाण बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण स्थळ आहे.[१] याला महापरिनिर्वाण विहार, महापरिनिर्वाण स्तूप किंवा परिनिर्वाण विहार असेही संबोधिले जाते.[२][३]अलेक्झांडर कनिंगहॅमने या क्षेत्रातील आपल्या कामात अधिक लक्ष दिले, व गौतम बुद्धांचा मृत्यू येथे झाला असे सिद्ध केले. सध्याचे विहार हे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण किंवा बुद्धाब्ध २५०० (बौद्ध युग)च्या २५०० व्या वर्षाच्या स्मरणार्थ साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकारने बांधला होता. या विहाराच्या आत उत्तर दिशेला उजव्या बाजूला बुद्ध प्रतिमा उत्तर दिशेने निद्रावस्थेत पडलेली दिसते. हा बुद्ध पुतळा ६.१ मीटर लांबीचा असून तो दगडी पलंगावर ठेवलेला आहे.[४]
इतिहास
बुद्धांच्या ह्या वर्षांच्या धम्मप्रचाराच्या घडामोडीनंतर, बुद्ध गंभीर अवस्थेत कुशीनगरला पोहोचले, जिथे त्यांनी आपला शेवटचा शिष्य नियुक्त केला आणि संघाला आपले शेवटचे शब्द उच्चारून इ.स.पू. ४८४ मध्ये महापरिनिर्वाण केले. मौर्य राजा अशोक यांनी इ.स.पू. २६० मध्ये कुशीनगरला भेट दिली व तेथे त्यांनी बुद्धांच्या निर्वाणाच्या स्थानाशी संबंधित अनेक पवित्र स्थळे - चैत्ये व स्तूपे बांधली.[५] पुढे कुषाण साम्राज्याच्या दरम्यान कुशीनगरचे महत्त्व वाढले, तर गुप्त साम्राज्याच्या काळात (इ.स. ३२० - ६४७ मध्ये) कुशीनगरने सुवर्णयुग पाहिले. तेव्हा ह्या परिनिर्वाण स्तूपाचा मोठा विस्तार होऊन त्यात विशाल बुद्ध पुतळा स्थापून परिनिर्वाण विहार पुनः उभारला गेला. कुशीनगर येथील हा विहार इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून पवित्र स्थळ म्हणून मान्यता पावला आहे.[६]
चित्रदालन
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b Knapp, Stephen (2009). Spiritual India handbook : a guide to temples, holy sites[,] festivals and traditions. Mumbai: Jaico Publishing. ISBN 978-81-8495-024-3. 18 July 2015 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "Jaico" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "महापरिनिर्वाण मंदिर, Kushinagar". hindi.nativeplanet.com. 2018-04-26 रोजी पाहिले.
- ^ Experts, Disha. Bharatiya Itihaas avum Kala Sanskriti IAS avum Rajaya Civil Sewa Samanya Adhyayan (हिंदी भाषेत). Disha Publications. ISBN 9789386320933.
- ^ "परीनिर्वाण". Buddhanet (इंग्रजी भाषेत). १८ जुलै २०१५ रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in:
|website=
(सहाय्य) - ^ Akira Hirakawa; Paul Groner (1993). A History of Indian Buddhism: From Śākyamuni to Early Mahāyāna. Motilal Banarsidass. p. 101. ISBN 978-81-208-0955-0.
- ^ Lars Fogelin (2015). An Archaeological History of Indian Buddhism. Oxford University Press. pp. 23–24. ISBN 978-0-19-994822-2.