Jump to content

परसरामबास

आचार्य परसराम बास हे महानुभाव पंथातील चौथे आचार्य आहेत. त्यांचा जन्म शके १२२० मधील होय. त्यांची आचार्य पदाची कारकीर्द शके १२४५ ते १२६५ दरम्यान सांगितली जाते. शके १२६५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आचार्य परसराम बास हे शेगाव जिल्हा अकोला येथीलच असल्याचे डॉ. संतोष ठाकरे यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. परसराम बास बाइदेव्यास यांचे शिष्य होते, परंतु त्यांचे ज्ञान गुरू दीक्षा गुरू हे कवीश्वर बासच होते हे स्पष्ट होते.

आचार्य परसराम बास यांनीनी सर्वप्रथम महानुभाव संप्रदायातील २४ पक्षकारांना एकत्र बसून २४ पक्षकारांची एक प्रमाणित प्रत निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतले. त्यांनी २४ पक्षकारांचा आधार घेऊन आपली प्रमाण प्रत सिद्ध केली

कवीश्वर भाषांच्या नंतर पंथामध्ये लीळाचरित्राच्या पाठाच्या संदर्भात अनेक भेद निर्माण होऊ लागले होते त्यावेळी परसराम भाषांनी सगळ्यांना एकत्र करून त्यातील मतमतांतरे जाणून घेतली आणि समृद्ध पाठ तयार केला

त्यांच्या विद्वतेबद्दल आनेराजबास पंडित त्यांच्या विषयी म्हणतात "परशुरामाचे बोलणे गगना गवसनी की" म्हणजेच परसरामबासाचे शास्त्र हे गग्नाएव्हढे विशाल आहे.

संदर्भ