Jump to content

परवीन बाबी

परवीन बाबी
जन्मपरवीन बाबी
४ एप्रिल १९५४ (1954-04-04)
जुनागढ, गुजरात
मृत्यू २० जानेवारी, २००५ (वय ५०)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९७२ - १९८३

परवीन बाबी (४ एप्रिल १९५४ - २० जानेवारी २००५) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. आपल्या ग्लॅमरस शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबी अमर अकबर ॲन्थनी, दीवार, नमक हलाल, शान इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिकांमध्ये चमकली. पडद्यावर अमिताभ बच्चनसोबत तिची जोडी लोकप्रिय होती.

आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना १९८३ साली परवीन बाबीने अचानक सिनेजगत सोडण्याचा निर्णय घेतला व ती जगप्रवासाला निघाली. ह्यादरम्यान तिची मानसिक स्थिती काहीशी बिघडल्याच्या चर्चा देखील चालू होत्या. १९९० च्या दशकात ती एकटी पडत गेली व २००५ साली स्वतःच्या घरी तिचा मृत्यू झाला.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील परवीन बाबी चे पान (इंग्लिश मजकूर)