Jump to content

परळ रेल्वे स्थानक

परळ रेल्वे स्थानक भारताच्या मुंबई शहरातील रेल्वेस्थानक आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर असलेले हे स्थानक पश्चिम मार्गाच्या प्रभादेवी स्थानकाशी पादचारी पुलाने जोडलेले आहे.

परळ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला मुंबई महानगरपालिकेचे राजा एडवर्ड स्मारक रुग्णालय स्थित आहे.येथे अत्यंत वाजवी भावात अत्यंत आवश्यक सर्व प्रकारची रुग्णसेवा उपलब्ध केली जाते. विशेषतः गरीब तसेच मध्यमवर्गीय लोकांना त्याचा फार फायदा होतो. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री असल्यामुळे निष्णात डॉक्टरांच्या साहाय्याने कठीणात कठीण अश्या शस्त्रक्रियासुद्धा येथे विनासायास यशस्वीरीत्या पार पाडल्या जातात.येथे डॉक्टरांसाठी अद्ययावत शैक्षणिककेंद्र सुद्धा आहे आणि वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे.

वरील रुग्णालयाच्या अगदी विरुद्ध दिशेला थोड्याच अंतरावर टाटा समूहाचे टाटा कर्करोग चिकित्सा रुग्णालय आहे. देशभरातील अनेक ठिकाणांहून येथे रुग्ण येतात व त्यांना अत्यंत किफायतशीर दरात येथे वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाते. काही ठिकाणी काही धर्मादाय संस्था रुग्णनातेवाईकांचीसुद्धा फारच माफक दरात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करतात.

परळ
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
करी रोड
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्यउत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दादर
स्थानक क्रमांक:मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी.