पमुला पुष्पा श्रीवानी
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून २२, इ.स. १९८६ पश्चिम गोदावरी जिल्हा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
पमुला पुष्पा श्रीवानी (जन्म २२ जून १९८६) ह्या एक भारतीय राजकारणी आहे ज्यांनी ८ जून २०१९ ते ७ एप्रिल २०२२ पर्यंत आंध्र प्रदेशच्या ११ व्या उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. सोबतच त्या आदिवासी कल्याण विभागाच्या मंत्री पण होत्या. त्या कुरुपम मतदारसंघातून आंध्र प्रदेश विधानसभेच्या सदस्या आहेत. त्या वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाच्या सदस्या आहेत. [१]
जून २०१९ मध्ये, त्यां वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील आंध्र प्रदेशच्या पाच उपमुख्यमंत्र्यांपैकी एक बनल्या आणि त्यांना आदिवासी कल्याण मंत्रीपदही देण्यात आले. [२] [३] [४]
२०१४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीत त्यांना ५५,४३५ मते मिळाली (४२.३%). २०१९ च्या निवडणूकीत त्यांना अजून मते मिळाली (७४,५२७ मते - ५३.७%).
खाजगी जीवन
पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील बुट्टायागुडेम मंडलातील दोरामामिडी गावात त्यांचा जन्म झाला. राजकारणात उतरण्यापूर्वी त्या व्यवसायाने शिक्षिका होत्या. २०१४ मध्ये सथरुचार्ला परीक्षित राजूसोबत त्यांचे लग्न झाले व त्या विजयनगरम जिल्ह्यात स्थलांतरित झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांना मुलगी झाली. २०२२ मधील तेलुगू चित्रपट अमृता भूमी मध्ये त्यांनी शिक्षीकेची भूमिका केली आहे ज्यात त्यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.[५]
संदर्भ
- ^ "Pamula Pushpa Sreevani(Yuvajana Sramika Rythu Congress Party):Constituency- KURUPAM(VIZIANAGARAM) – Affidavit Information of Candidate". myneta.info. 2022-11-15 रोजी पाहिले.
- ^ The Hindu Net Desk (2019-06-08). "Andhra Pradesh Ministers: Portfolios and profiles". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2022-11-15 रोजी पाहिले.
- ^ Apparasu, Srinivasa Rao (8 June 2019). "Jagan Reddy appoints Dalit woman as home minister of Andhra Pradesh". Hindustan Times. 17 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "Andhra Pradesh Ministers: Portfolios and profiles" (इंग्रजी भाषेत). 8 June 2019. 15 April 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 April 2022 रोजी पाहिले.
- ^ "Andhra Deputy Chief Minister Pushpa Sreevani gives birth to baby girl". 21 Feb 2021.