पनाबाका लक्ष्मी
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर ६, इ.स. १९५८ नेल्लोर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
डॉ. पनाबाका लक्ष्मी (जन्म ६ ऑक्टोबर १९५८) एक भारतीय राजकारणी आणि माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री (२००४-०९) आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (२००९-१४) आहेत. त्या आंध्र प्रदेशातील बापटला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या आणि एकत्रित आंध्र प्रदेशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या होत्या. आता त्या तेलुगु देसम पार्टीचा (टीडीपी) भाग आहे. [१]
वैयक्तिक जीवन
डॉ. पनाबाका लक्ष्मी यांचा जन्म कावली, नेल्लोर (आंध्र प्रदेश) येथे झाला आणि डॉ. पी. कृष्णैया यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुली आहेत. त्यांनी आंध्र विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात एमए पूर्ण केले आहे. [२]
कारकीर्द
त्या ११व्या, १२व्या आणि १४व्या लोकसभेसाठी नेल्लोरमधून आणि १५व्या लोकसभेसाठी बापटलामधून निवडून आल्या होत्या. त्या यूपीए सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री (२००४-०९),पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (२०१२-१४) आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री (२००९-१४) मध्ये राज्यमंत्री होत्या. [३]
वाय.एस.आर.काँग्रेसच्या बल्ली दुर्गा प्रसाद राव विरुद्ध टीडीपी उमेदवार म्हणून त्यांनी तिरुपतीमधून २०१९ लोकसभा निवडणूक अयशस्वीपणे लढवली. [४] विद्यमान खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तिरुपती जागेवरून त्यांनी २०२१ मधील पोटनिवडणूक लढवली. त्यात मद्दिला गुरुमूर्ती (वाय.एस.आर.काँग्रेस) निवडून आले.[५]
संदर्भ
- ^ Samdani MN (Mar 14, 2019). "Panabaka Lakshmi in TDP: Congress leaders Panabaka Lakshmi, Harsha Kumar join TDP | Vijayawada News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-04-20 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2019-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-02-16 रोजी पाहिले.
- ^ "Minister of State". Ministry of Petroleum and Natural Gas. 28 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 September 2013 रोजी पाहिले.
- ^ "Tirupati Election Results 2019: YSRCP's Balli Durga Prasad Rao has won with 228376 votes". www.timesnownews.com (इंग्रजी भाषेत). 2021-04-20 रोजी पाहिले.
- ^ Murali, S. (2021-04-06). "Panabaka Lakshmi blames YSRCP, BJP for rise in prices of essential commodities". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-04-20 रोजी पाहिले.