पद्मिनी कोल्हापुरे
पद्मिनी कोल्हापुरे | |
---|---|
जन्म | १ नोव्हेंबर, १९६५ मुंबई, महाराष्ट्र |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
वडील | पंढरीनाथ कोल्हापुरे |
नातेवाईक | श्रद्धा कपूर (भाची) |
पद्मिनी कोल्हापुरे ( १ नोव्हेंबर १९६५) या एक हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या मराठी अभिनेत्री आहेत. १९८०च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांची कामे आहेत.
नातेवाईक
प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत. फिल्म-निर्माता प्रदीप शर्मा (टुटू) हे पद्मिनीचे पती.
पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे यांची पत्नी ही दीनानाथ मंगेशकरांची बहीण लागे. पद्मिनीची आई एर हॉस्टेस होती. तिच्या नोकरीमुळे मुलींच्या संगोपनाची सर्व जबाबदारी पंढरीनाथांवर होती. कृष्णराव कोल्हापुरे हे दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक कंपनीमध्ये काम करणारे गायक नट होते. ते स्त्रीभूमिकाही करत.
चित्रपट कारकीर्द
पद्मिनी कोल्हापुरे जेव्हा चित्रपटसृष्टीत आल्या त्यावेळी बालकलाकारांची खूप मागणी होती. चित्रपटातील नायक किंवा नायिका यांचे बालपणापासूनची मैत्री दाखवून मग तरुणपणीचा रोमान्स दाखविण्याचा प्रघात होता.
पाच वर्षाची पद्मिनी ’एक खिलाडी बावन पते’ या चित्रपटातून पडद्यावर आली. गुलजार यांच्या किताब या बालचित्रपटात पद्मिनी आणि बहीण शिवांगी कोल्हापुरे यांनी 'अ-आ-इ-ई, मास्टरजी की आ गई चिट्ठी...' हे गाणे म्हणले होते. 'यादों की बारात' या चित्रपटाचे ’टायटल सॉंग लता मंगेशकर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी गायले होते. पद्मिनीचा आवाज खूप छान होता आणि मंगेशकरांशी नाते असल्याने लता-आशा मंगेशकरांबरोबर कोरस गाण्यासाठी पद्मिनीला संधी मिळे.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या प्रेम रोग ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.
'विधाता' चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे यांना दिलीप कुमार, संजीव कुमार और शम्मी कपूर या तीन महान कलावंतांबरोबर काम करायला मिळाले.
आहिस्ता-आहिस्ताचे शूटिंग पहायला आलेल्या प्रिन्स चार्ल्सचे पद्मिनी कोल्हापुरेने धावत धावत जाऊन चुंबन घेतले आणि तिला जगभर प्रसिद्धी मिळाली.
पद्मिनी कोल्हापुरे यांची भूमिका असलेले चित्रपट
- अनुभव (१९८६)
- आग का दरिया (१९९०)
- आज का दौर (१९८५)
- आठवॉं शनी (२००६)
- आहिस्ता-आहिस्ता (१९८१)
- एक खिलाडी बावन पत्ते (१९७२)
- एक नई पहेली (१९८४)
- इन्साफ का तराजू (१९८०)
- इन्साफ मैं करूंगा (१९८५)
- इश्क-इश्क-इश्क (१९७४)
- एक नई पहेली (१९८४)
- ऐसा प्यार कहॉं (१९८६)
- कर्मयोगी (२०१२)
- किरायादार (१९८६)
- कुर्बानी रंग लायेगी (१९९१)
- खुश नसीब (१९८२)
- गहराई (१९८०)
- जमाने को दिखाना है (१९८१)
- जिंदगी (१९७६)
- जुंबिश (१९८६)
- झॉंझर (१९८६)
- डॉटर (२०१३)
- ड्रीमगर्ल (१९७७)
- तेरी मॉंग सितारों से भर दूॅं (१९८२)
- तौहीन (१९८९)
- थोडी़-सी बेवफाई (१९८०)
- दर्द का रिश्ता (१९८२)
- दाता (१९८९)
- दादागिरी (१९८७)
- दाना पानी (१९८९)
- दुश्मन दोस्त (१९८१)
- दो दिलों की दास्तॉं (१९८५)
- नया कदम (१९८४)
- पत्थर दिल (१९८५)
- प्यार के काबिल (१९८७)
- प्यार झुकता नहीं (१९८५)
- प्यारी बहना (१९८५)
- प्रीती (१९८६)
- प्रेम रोग (१९८२)
- प्रोफेसर की पडोसन (१९९३)
- फटा पोस्टर निकला हीरो (२०१३)
- बेकरार (१९८३)
- बेवफाई (१९८५)
- बोलो राम (२००९)
- मजदूर (१९८३)
- माई (२०१३)
- मुद्दत (१९८६)
- यह इश्क नही आसॉं (१९८४)
- राही बदल गये (१९८५)
- लव्हर्स (१९८३)
- वफादार (१९८५)
- विधाता (१९८२)
- वो सात दिन (१९८३)
- शीशे का घर (१९८४)
- सड़क छाप (१९८७)
- सत्यम् शिवम् सुन्दरम् (१९७८)
- सागर संगम (१९८८)
- साजन बनी सुहागन (१९७८)
- सुहागन (१९८६)
- सौतन (१९८३)
- स्टार (१९८२)
- स्वामी दादा (१९८२)
- स्वर्ग से सुंदर (१९८६)
- हम इंतजार करेंगे (१९८९)
- हम हैं लाजवाब (१९८४)
- हमारा संसार
- हवालात (१९८७)
- चिमणी पाखरं (2003)
- पानीपत (२०१९)
- प्रवास (२०२०)[१]
बाह्य दुवे
इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील पद्मिनी कोल्हापुरे चे पान (इंग्लिश मजकूर)
- ^ "Padmini Kolhapure Biography » Age, Son, Wiki, Sister, Instagram, Facebook, Songs". Gesnap.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-05 रोजी पाहिले.