Jump to content

पद्मा गोळे

पद्मा गोळे
जन्म नाव पद्मावती विष्णू गोळे
टोपणनाव पद्मा
जन्मजुलै १०, इ.स. १९१३
तासगाव, जि.सांगली महाराष्ट्र
मृत्यूफेब्रुवारी १२, इ.स. १९९८
पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकविता, नाटक
पती विष्णू गोळे

पद्मा गोळे (जुलै १०, इ.स. १९१३; तासगाव - फेब्रुवारी १२, इ.स. १९९८) या मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार होत्या.

जीवन

पद्मा गोळ्यांचा जन्म १० जुलै, इ.स. १९१३ रोजी तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात [] जन्म झाला. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून[] एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले [].

त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा इ.स. १९४७ साली प्रकाशित झाला[]. कवितासंग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न (इ.स. १९५५), नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली.

प्रकाशित साहित्य

शीर्षकसाहित्यप्रकारप्रकाशकप्रकाशनवर्ष (इ.स.)भाषा
आकाशवेडीकवितासंग्रहइ.स. १९६८मराठी
श्रावणमेघकवितासंग्रहमराठी
प्रीतिपथावरकवितासंग्रहइ.स. १९४७मराठी
निहारकवितासंग्रहइ.स. १९५४मराठी
स्वप्नजाकवितासंग्रहइ.स. १९६२मराठी
स्वप्ननाटकइ.स. १९५५मराठी
रायगडावरील एक रात्रनाटकमराठी

संदर्भ

  1. ^ a b गोखले, विमल. "गोळे,पद्मा" : मराठी विश्वकोश, खंड ५. १० जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b "पद्मा गोळे". 2011-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे