पद्मनाभस्वामी मंदिर
पद्मनाभस्वामी मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या शहरात असलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.
मंदिराचा इतिहास
शेषशायी विष्णूचे हे पुरातन मंदिर आहे. सहाव्या ते नवव्या शतकातील तमिळ संतांच्या साहित्यांत या मंदिराचा उल्लेख आढळतो. वैष्णवांच्या पवित्र स्थानांपैकी हे एक महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अठराव्या शतकात झाला होता.