Jump to content

पदक

सर्वसामान्यपणे पदक हे एक चपटा, गोलाकार (कधीकधी लंबगोलाकार) असा धातूचा तुकडा असतो ज्यावर नक्षीकाम, मूर्तीकाम, ओतकाम अथवा छापकाम केलेले असते, अथवा कोणत्याही प्रकारे एखादी खूण, पोर्ट्रेट किंवा इतर कलाकारी त्यावर अंकित केलेली असते. हे पदक व्यक्तिंना अथवा संस्थांना, त्यांनी केलेल्या कार्याची ओळख व मान्यता म्हणून देण्यात येते. त्यात क्रिडाप्रकार, सैन्यदलातील विशेष कामगिरी, वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक कर्तुत्व किंवा इतर गोष्टीही राहू शकतात. एखाद्या विशेष प्रसंगाचा साक्षिदार म्हणून, पदके ही विक्रीसाठीही असू शकतात.

पूर्वीच्या काळी, एखाद्या व्यक्तिविशेषाद्वारे, राजकारणात अथवा वैयक्तिकरित्या त्यांची आठवण रहावी म्हणून, त्यांची छवी अंकित केलेली पदके वाटण्यात अथवा भेट देण्यात येत असत. त्याचा संबंध, स्वीकार करणाऱ्या व्यक्तिच्या कोणत्याही महान कामगिरीविषयी रहात नव्हता.

सहसा, अशा पदकांना गळ्यात घालून मिरविण्यास अथवा मनगटावर बांधण्यास कोणत्यातरी प्रकारच्या बंधनाची व्यवस्था असते. पदके ही, त्यांचा दिर्घकाळ टिकाव लागावा म्हणून, व त्यांना मौल्यवान समजण्यास, सोने रूपे अथवा तांब्याची अथवा मिश्र धातूंची असतात.

विविध पदके