पत्रकार दिन (महाराष्ट्र)
महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.
बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
भाषेत गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.
त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.
वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.
आपण पत्रकार दिन का साजरा करतो हे जर आपल्याला माहिती नसेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही.. मी या संदर्भात वारंवार खुलासे केलेले असले तरी आपण वारंवार तीच चूक करतो आहोत.. 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती नाही.. बाळशास्त्रींची जयंती 20 फेब्रुवारी रोजी असते.. 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले.. त्याचे स्मरण म्हणून आपण 6 जानेवारी रोजी दर्पण दिन किंवा पत्रकार दिन साजरा करतो.. 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती असल्याचा चुकीचा उल्लेख गुगलवर आहे.. याची नोंद घ्यावी.. बाळशास्त्रींचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी झाला.. मृत्यू 17 मे 1848 रोजी झाला.. या तारखा सरकारने नक्की केलेल्या आहेत.. तसा सरकारचा जीआर आहे.. तेव्हा चुकीच्या माहितीच्या आधारे कोणी चुकीचे उल्लेख करू नयेत ही विनंती