पत्रकार
वृत्तपत्रांत नियमितपणे लेखन करणाऱ्या, तसेच बातम्या देणाऱ्या लेखकांना पत्रकार असे म्हणतात. अरुण साधू हे लेखक पत्रकार आहेत. प्र. के. अत्रे हे पत्रकार लेखक होते. प्रमोद नवलकर हे मुंबई शहरात शोध पत्रकारिता करीत असत. पत्रकारांना समाज जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो.
पत्रकार
मुक्त पत्रकारिता
मुक्त पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही संस्थेला बांधील नसतात. त्यांना त्यांच्या कामासाठी स्वतःच बाजारपेठ शोधावी लागते. आवश्यक कौशल्य, दृष्टिकोन : या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडे बहुश्रुतता, विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण वाचन, स्वतःचे मत स्पष्ट शब्दात लिहिण्याची क्षमता, एखाद्या घटनेचे विश्लेषण करण्याची क्षमता, प्रसंगी संशोधनात्मक काम करण्याची मनाची तयारी, सामाजिक भान, वेळेचे बंधन पाळण्याची हातोटी, उत्कृष्ट आकलनक्षमता, मातृभाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी तसेच शक्य तितक्या इतर भाषेचे ज्ञान असणे, वगैरे गोष्टी त्यांना हे काम करण्याच्या दृष्टीने सोयीचे जाते.पत्रकाराला वृत्तपत्र/ प्रकाशन व्यवसायाची आवड व त्याचे थोडेफार ज्ञान असणे, व प्रवास व चौफेर-चौकस बुद्धिमत्ता आणि कष्ट करण्याची मनाची तयारी आवश्यक आहे.
पीत पत्रकारिता
पत्रकार : हा रोज घडणाऱ्या नवीन घटना घडामोडी सामान्य जनतेपर्यंत पोहचवणारी व्यक्ती असतो. तो विविध क्षेत्रातंील घटना तसेच नवीन माहिती लोकांना पुरवत असतो. चांगला पत्रकार होण्यासाठी बातमीचे चांगले स्रोत त्याच्याकडे उपलब्ध असायला हवे. पत्रकाराला बातमी मूल्याचे योग्य ज्ञान असायला हवे.[[वर्ग:पत्रकार| ]