Jump to content

पत्ते

पत्ता हा पुठ्ठ्यापासून किंवा प्लास्टिकपासून बनविण्यात येणारा एक हाताच्या पंजाएवढा पातळ चौकोनी कागद आहे.

अनेक पत्त्यांच्या संचाला कॅट म्हणतात (मराठी शब्द असेल तर सुचवावा). परंतु एका कॅटमध्ये काही विशिष्ट पत्तेच असावे लागतात. पत्ते हे विविध बैठे खेळ खेळण्यासाठी वापरण्यात येतात.

सर्व पत्त्याची एक बाजू समान असते (बहुधा कोरी असते किंवा काही चित्र असते). मात्र प्रत्येक पत्त्याची दुसरी बाजू दुसऱ्या पत्त्यापासून वेगळी असते. खेळाव्यतिरीक्त पत्त्यांचा वापर जादूमध्ये, भविष्यकथनात व पत्त्यांचे बंगले बनविण्यातही होतो. जुगारामध्येही त्यांचा वापर विशेषकरून होतो.

इतिहास

पत्त्यांची सुरुवात चीनमध्ये झाली.

पत्त्यांचे प्रकार

एका कॅटमध्ये ५२ पत्ते व दोन जोकर (विदुषक) असतात. ह्या बावन्न पत्त्यांमध्ये तेरा पत्त्यांचे चार गट असतात. हे गट पुढीलप्रमाणे:

  • इस्पिक (चिन्ह: ♠)
  • बदाम (चिन्ह: )
  • चौकट (चिन्ह: )
  • किल्वर (चिन्ह: ♣)

प्रत्येक गटामध्ये पुढीलप्रमाणे पत्ते असतात.

  • एक्का (चिन्ह: A)
  • राजा/बादशहा (चिन्ह: K)
  • राणी/बेगम (चिन्ह: Q)
  • गुलाम/गोटू/झब्बू (चिन्ह: J)
  • दश्शी (चिन्ह: 10)
  • नव्वी (चिन्ह: 9)
  • अठ्ठी (चिन्ह: 8)
  • सत्ती (चिन्ह: 7)
  • छक्की (चिन्ह: 6)
  • पंजी (चिन्ह: 5)
  • चव्वी/चौरी/चौकी (चिन्ह: 4)
  • तिर्री (चिन्ह: 3)
  • दुर्री (चिन्ह: 2)

पत्त्यांचे खेळ

पत्त्यांचा सर्वात सोपा आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे भिकार-सावकार. इतर प्रसिद्ध खेळ पुढीलप्रमाणे,

  • पाच-तीन-दोन
  • सात-आठ/सत्ती-अठ्ठी
  • बदाम सात
  • झब्बू
  • ब्रीज
  • रमी
  • ३०४
  • मुंगूस
  • Not At Home
  • जड्‍जमेंट
  • चॅलेंज
  • हार्टस
  • स्पेडस
  • पोकर

हे सुद्धा पहा