Jump to content

पंतप्रधान संग्रहालय

पंतप्रधान संग्रहालय हे तीन मूर्ती मार्ग क्षेत्र, नवी दिल्ली, दिल्ली येथे आहे. या संग्रहालयात देशातील सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांनाही या संग्रहालयात विशेष स्थान देण्यात येणार आहे. तरुण पिढीला सर्व भारतीय पंतप्रधानांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि कार्याबद्दल माहिती व्हावी, त्यामधून प्रेरणा मिळावी, यासाठी हे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. तीन मूर्ती भवनातील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीला लागून असलेल्या १०,००० चौरस मीटर जागेवर बांधण्यात आलेल्या या संग्रहालयात माजी पंतप्रधानांशी संबंधित प्रदर्शने आहेत. २७१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाला २०१८ मध्ये मंजूरी देण्यात आली होती. संग्रहालयात एकूण ४३ दालनं आहेत. तसेच संग्रहालयाचा लोगो राष्ट्र आणि लोकशाहीचे प्रतीक असलेले धर्मचक्र धारण केलेल्या भारतातील लोकांच्या हातांचे प्रतिनिधित्व करतो.

पंतप्रधान संग्रहालयात पंतप्रधान यांचे दुर्मिळ फोटो, त्यांची भाषणं, मूळ लेखन यासारख्या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रात जी लोकं उच्च पदावर असतात त्यांच्या जीवनाचा अभ्या करतो हे इतिहासाचं अवलोकनचं असतं. मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचं जीवन इतिहासाची निर्मिती करत असते. या संग्रहालयातून स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. पंतप्रधानांच्या कामाला जाणून घेणं हे स्वतंत्र भारताच्या वाटचालीला समजून घेणं ठरेल. आपल्या देशाचे सर्वाधिक पंतप्रधान सामान्य कुटुंबातील व्यक्ती बनल्या आहेत. आपल्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. शेतकरी कुटुंबातून, सामान्य कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान होतो, ही भारताच्या लोकशाही व्यवस्थेसंदर्भातील अभिमानाची गोष्ट आहे.

हे सुद्धा पहा

भारताचे पंतप्रधान