Jump to content

पंढरपूर रेल्वे स्थानक

पंढरपूर
पंढरपूर रेल्वे स्थानक
मध्य रेल्वे स्थानक
मुख्य प्रवेशद्वार, पंढरपूर रेल्वे स्थानक (२०२०)
स्थानक तपशील
पत्ता स्टेशन रोड, पंढरपूर, सोलापूर
गुणक17°43′42″N 75°19′04″E / 17.72833°N 75.31778°E / 17.72833; 75.31778
समुद्रसपाटीपासूनची उंची ५०६ मीटर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन अज्ञात
विद्युतीकरण होय
संकेत PVR
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
पंढरपूर is located in महाराष्ट्र
पंढरपूर
पंढरपूर
महाराष्ट्रमधील स्थान

पंढरपूर रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य झोनमधील सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.[]

विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र असल्याने हे स्थानक नेहमी व्यस्त असते. पंढरपूरच्या वाऱ्यांसाठीही अनेक विशेष गाड्या सुरू कराव्या लागतात.[] मुंबई आणि सातारा यांना जोडणारी सातारा - दादर एक्स्प्रेस ही गाडी पर्यटकांची संख्या लक्षात घेऊनच सुरू करण्यात आली होती. इतर अनेक महत्त्वाच्या गाड्यांनी हे स्थानक पंढरपूरला महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांशी जोडते.[][]

स्थानकाचा साइनबोर्ड

इमारत

मंदिराच्या शैलीत स्थानकाचे प्रवेशद्वार तयार केले आहे. तसेच स्थानकाच्या समोर एक छोटी बाग आहे. या बागेत ब्रिटिशकालीन रेल्वेचे इंजिनचा नमुना पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवले आहे. हे इंजिन पर्यटकांना नेहमी आकर्षित करते.

रेल्वे स्थानकाच्या समोर हे ब्रिटिशकालीन रेल्वे इंजिनीचा नमुना.

वेळापत्रक

  • ०१४१४ पंढरपूर - निझामाबाद एक्सप्रेस विशेष
  • ११०४५ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर - धनबाद साप्ताहिक एक्सप्रेस
  • ०१५४६  मिरज - कुर्डूवाडी डेमू विशेष
  • ११४०३ नागपूर - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस   
  • २२१५५ कलबुर्गी - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस
  • ०१५४५ कुर्डूवाडी - मिरज डेमू विशेष
  • १६५४२ पंढरपूर - यशवंतपूर साप्ताहिक एक्सप्रेस
  • ११४११ परळी वैजनाथ - मिरज डेमू एक्सप्रेस   
  • ११४०४ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर - नागपूर एक्सप्रेस   
  • २२१५६ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर - कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस   
  • ११०२८  सातारा - दादर सेंट्रल एक्सप्रेस     
  • ११४१२ मिरज - परळी वैजनाथ डेमू एक्सप्रेस  

संदर्भ

  1. ^ "Pandharpur Railway Station News - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2022-01-31 रोजी पाहिले.
  2. ^ ब्युरो, सरकारनामा. "कार्तिकी यात्रा : लालपरीनं पाठ फिरविल्याने वारकऱ्यांसाठी रेल्वे आली धावून!". Sarkarnama. 2022-01-31 रोजी पाहिले.
  3. ^ "पंढरपूरसाठी १४ जुलैला धावणार विशेष रेल्वे". Maharashtra Times. 2022-01-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Good News : बहुचर्चित फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु; रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद". eSakal - Marathi Newspaper. 2022-01-31 रोजी पाहिले.