Jump to content

पंडित गुरूदत्त विद्यार्थी

पंडित गुरुदत्त विद्यार्थी महर्षि दयानंद सरस्वती यांचे शिष्य होते.

बालपण आणि तारुण्य

आर्य समाजाच्या पाच प्रमुख नेत्यापैकी पंडित गुरुदत्त विद्यार्थी हे एक नेते होते. त्यांचा जन्म 26 एप्रिल 1864 मध्ये पाकिस्तानातील मुल्तान या ठिकाणी झाला. वडील लाला रामकृष्ण हे पर्शियन भाषा व साहित्यांचे प्रसिद्ध विद्वान होते. ते पंजाबमधील शिक्षण विभागातील झंग स्कूलचे शिक्षक होते. पंडित गुरुदत्त विद्यार्थी यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. ते आपल्या मित्रामध्ये खूप हुशार होते. लहानपणापासूनच त्यानां हिंन्दी, उर्दू, अरबी आणि फारशी भाषा अवगत होत्या. त्यांनी लहानपणीच ’द बायबल इन इंडिया’ व ग्रीस इन इंडिया’ यासारख्या ग्रंथांचे वाचन केले होते. पंडित गुरुदत्त विद्यार्थी काॅलेजच्या दुसऱ्या वर्षी असताना त्यांने चाल्र्स ब्रेडले, जेरेमी बेथम, जाॅन स्टुअर्ट मिल यासारख्या पाशचत्य विचारवंताच्या ग्रंथाचे वाचन केले होते. मार्च 1986 मध्ये पंजाब विद्यापीठाची एम.ए. (विज्ञान, नेचरल सायन्स) या विषयात प्रथम क्रमांक पटकावला होता.

आर्य समाजाचा प्रभाव

त्याच कालखंडात महर्षि दयानंद सरस्वती यांच्या कार्यांचा प्रभाव पंडित गुरुदत्त विद्यार्थी यांच्यावर पडला. पुढे त्यांनी 20 जून 1880 मध्ये आर्य समाजाचे सदस्य झाले. त्यांचे महात्मा हंसराज व लाला लजपत राय हे ही मित्र झाले. ते ’द रिजेनरेटर आॅफ आर्यवर्त’चे संपादक होते. पंडित गुरुदत्त विद्यार्थी यांनी 1884 मध्ये ’आर्यसमाज सायन्स इन्स्टीटयूशन’ची स्थापना केली. महर्षि दयानंद सरस्वती यांचे कार्य मृत्युनंतर सुद्धा जिवंत राहण्यासाठी पंडित गुरुदत्त विद्यार्थी यांनी त्यांच्या स्मरणार्थ ’दयानंद एंग्लो वैदिक काॅलेजचा प्रस्ताव ठेवला. पंडित गुरुदत्त विद्यार्थी, लाला लजपत राय आणि महात्मा हंसराज यांनी 1 जून 1886 मध्ये लाहोर येथे डी.ए.वी. स्कूलची स्थापना केली. त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीमुळे त्यांचे अंतःमन पूर्णपणे नास्तिक बनले होते. पंरतु महर्षि दयानंद सरस्वती यांचा भेटीनंतर त्यांचे विचार पूर्णपणे बदलले. संपूर्ण भारतामध्ये ते शास्त्र विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून निवड झालेले पहिले भारतीय होते. ते प्रभावी वक्ता होते, त्यंाचे भाषण ऐकण्यासाठी प्रंचड गर्दी होत असे. त्यानी उपनिषद या ग्रंथाचे अनुवाद केले. पंडित गुरुदत्त विद्यार्थी यांचे संपूर्ण कार्ये इंग्रजीमध्ये चालत असे. त्याचा ग्रंथ ’द टर्मिनाॅलाॅजी आॅफ वेदाज्’ हा आक्साफोर्ड विद्यापीठयाच्या पाठ्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला होता.

त्यांचे राहणीमान साधे व आचार, विचार मात्र उच्च प्रतीचे होते. विद्वत्ता आणि ईशवरभक्ती यांचा अद्भुत संगम त्यांच्या ठायी होता. त्याना वेद व संस्कृत खूप आवडत असे, ते म्हणत असे, ’’कितना अच्छा हो यदि मैं समस्त विदेशी शिक्षा को पूर्णतया भूल जॉंऊ तथा केवल विशुद्ध संस्कृतज्ञ बन सकूॅ!’’ त्याचे ’वैदिक मैगजीन’ नावाचे संशोधन पुस्तिका भारताबरोबरच परदेशात ही प्रसिद्ध झाले होते. अशा या महान विचारवंत, आर्य समाजाचे प्रचारक पंडित गुरुदत्त विद्यार्थी यांचा 19 मार्च 1890 मध्ये मृत्यु झाला. आज ही त्यंाच्या विचाराचा वारसा डी.ए.वी. व आर्य समाज जपत आहे.

संदर्भ

१) A BIOGRAPHICAL SKETCH OF PANDIT GURUDATTA (By Pt.Chamupati M.A.) डाॅ. बाळकृष्ण हरी माळी इतिहास विभाग दयानंद महाविद्यालय, सोलापूर.