पंचाळी
पंचाळी हे गाव भारतात महाराष्ट्र राज्यात पालघर जिल्ह्यात पालघर तालुक्यात उत्तर कोकणात वसलेले आहे.
भौगोलिक स्थान
पालघर रेल्वे स्थानक ते पंचाळी गाव ८ किमी अंतर आहे. पंचाळी हे पालघर-बोईसर रस्यावर आहे. येथील हवामान उन्हाळ्यात दमट व उष्ण व हिवाळ्यात शीतल असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असल्याने समशीतोष्ण हवामानाचा अनुभव येतो. जमीन निचरा होणारी नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून रस्ते खराब होऊन खड्डे पडतात.
लोकजीवन
पिढ्यानपिढ्या येथे पांचाळ (लोहार), वाडवळ, वैती, हरिजन, माच्छी व काही प्रमाणात आदिवासी समाजातील लोकांची वस्ती आहे. मराठी भाषेबरोबरच येथे पांचाळी, वाडवळी, वैती, मितनी ह्या बोलीभाषा बोलल्या जातात.पांचाळी बोलीभाषा ही गुजराती व मराठी भाषेच्या संयोगातून तयार झालेली एक लयबद्ध बोलीभाषा आहे. शेतीबरोबरच लोहारकाम, सुतारकाम, गवंडीकाम हा येथील मुख्य व्यवसाय आहेत. ताडी काढण्याचा, वीटभट्टी व वाडी व्यवसायही येथे लहान प्रमाणात चालतो तर मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते
पंचाळी ग्रामपंचायत ही आगवन पाडा, जांबुळ पाडा व मुळ पंचाळी गाव अशी एकत्रित ग्रामपंचायत आहे.
सोयी सुविधा
प्राथमिक शिक्षणाची सोय गावात आहे. माध्यमिक, उच्च शिक्षणासाठी पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक सोयी उपलब्ध आहेत.न्यायालय, तहसील कार्यालय, जिल्हा कार्यालय, पोलीस कार्यालय पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे.
पंचाळी गावचे वैशिष्ट्य असलेला एक शिव कालीन पुरातन असा किल्ला गावात ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या बाजूस आहे.
गावात एक मराठी शाळा आहे. गावात महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त लिटिल फ्लॉवर इंग्रजी शाळा देखील आहे दळणवळणासाठी पालघर बोईसर हा मुख्य रोड आहे जवळच रोजगारीसाठी बोईसर येथे एम आई डी सी आहे. ह्या गावाला रेल्वेने जायचे असल्यास सुद्धा सुखकर मार्ग आहे कारण पालघर - उमरोळी - बोईसर ह्या तीन रेल्वे स्थानकांवरूनदेखील जाता येते पालघर रेल्वे स्थानक पासून ७ किमी, उमरोळी रेल्वे स्थानक १ किमी व बोईसर रेल्वे स्थानक ५ किमी इतके अंतर आहे. पंचाळी गावच्या अगदी हाकेच्या अंतरावर कोळगाव मधे पालघर ह्या नवीन प्रस्तावित जिल्हाचे मुख्यालय काम चालू आहे तसेच टाटा हाउसिंग प्रकल्प न्यू हेवन पेस-II (बोईसर) देखील पंचाळी पूर्व जांबुळ पाडा येथे विस्तीर्ण जागेत होत आहे व पारसनाथ नगरी गृहनिर्माण प्रकल्प पंचाळी पश्चिमेला येथे होत आहे तसेच भविष्यात रेल्वे स्थानक देखील होणार आहे असे रेल्वेने जाहीर केले आहे. पंचाळी गावाला पंचाळी हे नाव पाच जातींच्या लोकवस्तीमुळे मिळाले आहे. वाडवळ, वैती, लोहार (पांचाळ), हरिजन व मिटण्या (माच्छी) हा पाच मुळ समाज लाभल्या पाच समाज्यांची आळी उदा. पाच + आळी = पंचाळी हे नाव अस्तित्वात आले......कौशिक पाटील
संदर्भ
१. [१]
२. [२]