Jump to content

पंचामृत

पंचामृत हा खाद्यपदार्थ आहे.पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे शरीर अथवा मन शुद्धीकरण करण्यास प्यायचे द्रव्य.

दोन प्रकारच्या पदार्थाना "पंचामृत" अशी संज्ञा वापरली जाते.

तोंडी लावण्याचा पदार्थ

दाण्याचे कूट, तीळ, गूळ, काजू, धने आणि जिरे पूड, सुके खोबरे, चिंचेचा कोळ या मिश्रणाला फोडणी देऊन चटणी सारखा पदार्थ केला जातो. त्यालाही पंचामृत म्हणले जाते.[]

देवपूजेत

गाईचे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणातून पंचामृत बनते.[] सोळा उपचारात पंचामृतस्नान हा एक देवपूजेतील उपचार मानला गेला आहे.[] पूजा झाल्यानंतर देवतेचे तीर्थ म्हणून पंचामृत सेवन करण्याची पद्धती आहे.[]

आहारदृष्ट्या महत्त्व

गर्भवती स्त्रीने तिच्या आणि गर्भाच्या उत्तम वाढीसाठी दररोज पंचामृत म्हणजे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण प्यावे असे सांगितले आहे.[] ज्योतीसतत्त्व या ग्रंथात गर्भवतीला दिनशुद्धी पाहून पंचामृत प्यायला द्यावे असे सांगितले आहे.[]

संदर्भ

  1. ^ The Beginner S Cook Book: Vegetables (इंग्रजी भाषेत). Global Vision Publishing House. 2004. ISBN 9788182200371.
  2. ^ a b Arora, Akankssha (2018-10-16). Genius in Making (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 9781644291436.
  3. ^ Joshi, Mahadeoshastri Sitaram (1968). Pūjāvidhāna. Jñānarāja Prakāśana.
  4. ^ Sadaiv, Shashikant (2018-05-22). Hindu Sanskriti Aur Gaye (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789352960538.
  5. ^ जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ. pp. ३०३.