Jump to content

पंचशील

पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावळी आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील ही पाच नियमे आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरीरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्यासाठी हे पाच गुण सांगितले आहेत. खालील पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व बौद्ध ही पाच शीले पाळतात.

पंचशीलाचा पाली व मराठीतील भाषांतर पुढीलप्रमाणे.
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून ही पाचही शीले आत्मसात केली तर ती व्यक्ती शीलवंत बनते.

शीलग्रहन प्राप्तीसाठी पायऱ्या

शीलग्रहणाच्या दोन पद्धती आहेत. ज्याठिकाणी भिक्खू नाही, तेथे पाच शीलांचा उच्चार व्यक्तीनेच (बौद्ध उपासक) करावयाचा असतो. दुसरी पद्धत अशी की, व्यक्तीने/उपासकाने भिक्खूसमोर नम्रपणे बसावे व हात जोडून भिक्खुना शीले देण्यासाठी विनंती करावी.

ओकास वन्दामि भन्ते ।
ओकास द्वारत्तयेन कतं संब्ब अपराधं खमतूमे भन्ते
ओकास अहं भन्ते तिसणेन सह पंचशील धम्म याचामि ।
अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।
दुतियम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि ।
अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।
ततियाम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि
अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।

नंतर भंते खालील ओळी तीन वेळा म्हणतील :-

नमोतस्स भगवतो अरहतो । सम्मा सम्मबुद्धस

बौद्ध उपासकांनी हे त्यांच्या मागे म्हणावे. त्रिशरण ग्रहणानंतर खालील ओळी भंते म्हणतील:-

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ