Jump to content

पंकज कपूर

पंकज कपूर
पंकज कपूर
जन्मपंकज कपूर
कार्यक्षेत्रअभिनेता

पंकज कपूर (२९ मे, इ.स. १९५४ - हयात) हे हिंदी भाषेतील चित्रपट अभिनेते आहेत. मूलतः भारतातील पंजाब राज्यातल्या लुधियान्याचे असलेले पंकज कपूर हे हिंदी नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांत अभिनय करणारे एक कलावंत आहेत. ते अनेकदा चित्रपटांत व चित्रवाणीवरील मालिकांत दिसतात. त्यांची सर्वांत प्रशंसनीय कामगिरी एक डॉक्टर की मौत (इ.स. १९९१) आणि इ.स. २००३ मध्ये निघालेल्या विशाल भारद्वाज-दिग्दर्शित मकबूल या चित्रपटांत दिसली. या दोन्ही भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते.

इ.स. १९८० ते इ.स. १९९० मध्ये चित्रवाणीवर आलेल्या करमचंद आणि नंतर आलेल्या सार्वजनिक कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर टिप्पणी करणारी एक विनोदी मालिका(जबान सॅंभाल के) यांतल्या भूमिकांद्वारे पंकज कपूर यांना घराघरांमधून लोकमान्यता मिळाली.

शिक्षण

पंकज कपूर प्रथम नवी दिल्ली येथे इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. त्या महाविद्यालयातून ते इ.स. १९७३ मध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी), येथून अभिनयाची पदवी मिळवली. तेथेही त्यांना त्या वर्षीचे अभिनयाचे पहिले बक्षीस मिळाले.

कारकीर्द

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडल्यावर पुढची चार वर्षे कपूर यांनी नाटकांतून कामे केली, आणि त्याच सुमारास रिचर्ड एटनबरो यांच्या दिग्दर्शनाखाली गांधी या चित्रपटात एक भूमिका केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी त्यांनी महात्मा गांधीच्या भूमिकेला आवाज दिला होता.

पंकज कपूर यांनी आत्तापर्यंत ७४हून अधिक नाटकांचे आणि मोहनदास बीए एलएलबी, वाह भाई वाह, साहेबजी बिबीजी गुलामजी', दृष्टान्त, कनक डी बल्ली, अल्बर्ट ब्रिज आणि पांचवां सवार या चित्रवाणी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

प्रमुख चित्रपट

वर्षचित्रपटभूमिकाटिप्पणी
२००७हल्ला बोल
२००५दस
२००३मकबूलजहॉंगीर ख़ान
२००३मैं प्रेम की दीवानी हूॅंसत्यप्रकाश
१९९५राम जानेपन्नू टेक्निकलर
१९९१एक डॉक्टर की मौत
१९८९राखइन्स्पेक्टर पी.के.
१९८९कमला की मौतसुधाकर पटेल
१९८७ये वो मंज़िल तो नहीं
१९८६चमेली की शादीकल्लूमल कोयलेवाला
१९८६मुसाफ़िर
१९८५आघात
१९८५खामोश
१९८४कंधार
१९८३जाने भी दो यारोंतरनेजा

नाटके

  • मोहन जोशी हाज़िर हो (१९८४)
  • एक रुका हुआ फ़ैसला (१९८६)
  • रोजा (१९९२)
  • छतरी चोर (द ब्लू अंब्रेला) (२००५)
  • सेहर (२००५)
  • हल्ला बोल (२००७)
  • धर्म (२००७)

टी.व्ही कार्यक्रम

  • करमचंद (१९८५-१९८८)
  • नीम का पेड़ (१९९१)
  • ऑफिस ऑफिस
  • जबान संभाल के

पुरस्कार

  • २००५ - सर्वश्रेष्ठ अभिनयासाठी फिल्मफेर पुरस्कार - चित्रपट : मकबूल

राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार

  • २००४ - राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार - सर्वश्रेष्ठ साहाय्यक अभिनेता पुरस्कार - चित्रपट : मकबूल
  • १९८९ - राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार - सर्वश्रेष्ठ साहाय्यक अभिनेता पुरस्कार - चित्रपट : राख

संदर्भ