Jump to content

प.रा. दाते

प.रा.दाते
जन्म नाव परशुराम रामचंद्र दाते
टोपणनाव अण्णाराव
भाषामराठी
साहित्य प्रकार इतिहास
वडील रामचंद्र दाते

प.रा. दाते किंवा परशुराम रामचंद्र दाते हे इतिहास लेखक होते. ते मूळचे रायगड जिल्ह्यातील पेण येथील होते. प.रा. दातेंनी किल्ले तसेच इतिहासविषयक अनेक पुस्तकांचे लेखन केले, तसेच ती पुस्तके स्वतः प्रकाशितही केली.

प.रा. दाते यांनी लिहिलेली पुस्तके

  • कुलाबा जिल्ह्यातील विधायक कार्याचा इतिहास अर्थात श्री सीताराम विश्वनाथ टिळक यांचे चरित्र
  • दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचे चरित्र, १९६८
  • सरखेल कान्होजी आंग्रे  सुरस कथामाला, भाग १ - बालपण व अभ्युदय, १९६४ , १९७३
  • सरखेल कान्होजी आंग्रे  सुरस कथामाला, भाग २ - कान्होजीची महाराष्ट्रातील महान कर्तबगारी , १९६५
  • सरखेल कान्होजी आंग्रे  सुरस कथामाला, भाग ३ - मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरची फटफजिती , १९६६
  • सरखेल कान्होजी आंग्रे  सुरस कथामाला, भाग ४ - कीर्तीच्या शिखरावर आणि अवतार समाप्ती, १९६८
  • थरारली शिवशाही, १९७५
  • परमवीर तानाजी मालसुरे,
  • कवींद्र परमानंद व शिवभारत, १९७४
  • पेण तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्राम, १९७२
  • महाराष्ट्राची राजकीय पंढरी रायगड, १९६२, १९७४ (प्र.के.घाणेकर संपादित 'रायगड दर्शन - दुर्मिळ पुस्तकांतून' ह्या ग्रंथात पुनर्मुद्रण , २०१६)
  • यशवंत बाळाजी आवजी, १९७६
  • सतीची समाधी , १९७७
  • तीर्थयात्रा , १९७२
  • विळखा : दारुच्या दुष्परिणामावरील गोष्टी