Jump to content

न्यूमोनिया

न्युमोनिया
----
A Xray showing a white wedge in the right lung field of a chest X-ray.
A chest X-ray showing a very prominent wedge-shaped bacterial pneumonia in the right lung.
ICD-10 J12, J13, J14, J15, J16, J17, J18, P23
ICD-9480-486, 770.0
DiseasesDB10166
MedlinePlus000145
eMedicinetopic list
MeSHD011014

'न्युमोनिया' हा फुफ्फुसांचा सांसर्गिक आहे. ह्यामध्ये फुफ्फुसांच्या आतील अल्वोली - म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते व त्यात कफसारखा द्रव जमुन रहातो. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.

न्यूमोनिया हे लक्षण आहे. नेमक्या आजाराचे नाव नाही. पण डॉक्टर न्यूमोनिया फारसा काळजी करण्यासारखा आजार असल्याचे सांगतात. या आजारात प्रचलित असलेली आणखी एक वैद्यकीय शब्द म्ह्णजे डबल न्यूमोनिया- म्ह्णजे दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग पोहोचल्याचे लक्षण. दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग होणे ही सामान्य बाब आहे. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसामध्ये जिवाणू, विषाणू किंवा कवकांचा संसर्ग होतो. फुफ्फुसाच्या वायुकलिकामध्ये द्रव किंवा पू साठतो. यामुळे वायुकलिकामधून पुरेसा ऑक्सिजन शरीरास मिळत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशींचे कार्य नीट्से होत नाही. योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. न्यूमोनियाचे तीन प्रकार आहेत जिवाणूजन्य, विषाणूजन्य आणि मायकोप्लाझमा (कवक). न्यूमोसिस्टिस कॅरिनी नावाच्या कवकामुळे झालेला न्यूमोनिया विरळा आहे . या प्रकारचा न्यूमोनिया सहसा एड्स रुग्णाना होतो. क्षयाचे पर्यवसान कधी कधी न्यूमोनियामध्ये होते. निरोगी व्यक्तीचा मृत्यू न्यूमोनियाने सहसा होत नाही. पण न्यूमोनियाने फुफ्फुसात घर केले म्ह्णजे एड्स झालेल्या रुग्णाच्या जीवितास धोका उद्भवतो. सध्या उत्तम उपचार उपलब्ध असल्याने न्यूमोनियाने मरण पावणा-या व्यक्तींची संख्या कमी झाली आहे. तरी पण जगभराच्या म्रृत्यूचे न्यूमोनिया हे सातवे कारण आहे. Pneumonia is treated by the antibiotic Penicillin.

न्यूमोनियाची लक्षणे

  • ताप
  • थंडी वाजणे
  • खोकला
  • श्वास जलद होणे (गति वाढणे )
  • श्वास घेताना धाप लागणे
  • छातीत आणि पोटात दुखणे
  • शक्तिपात
  • उलट्या

जिवाणूजन्य न्यूमोनिया हळुवारपणे किंवा एकाएकी उत्पन्न होतो.

गंभीर न्यूमोनिया रुग्णामधील लक्षणे

  • हुडहुडी भरणे.
  • तीव्र ताप
  • छातीत दुखणे
  • अपुरा श्वास
  • खोकल्यातून हिरवा, पिवळा किंवा तपकिरी कफ

विषाणूजन्य न्यूमोनियाची प्रारंभीच्या काळातील लक्षणे फ्लूसारखी असतात. ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, अंग दुखी आणि अशकतपणा .याशिवाय 12-36 तासात रुग्णास अधिकाधिक श्रेणीमध्ये श्वास लागतो. श्वसन अपुरे होते, कफ़ तीव्र होतो, थोडा कफ पडतो. ताप वाढतो.श्वास घेणे कठीण होते. आणि ओठ निळे पडतात. टोकाच्या गुंतागुंतीमध्ये जिवाणू संसर्ग होतो.

मायकोप्लाझमा न्यूमोनियाची लक्षणे

मायकोप्लाझमा न्यूमोनियाची लक्षणे भिन्न आहेत. याला चालता फिरता (वॉकिंग) न्यूमोनिया म्हणतात. याची लक्षणे विविध आहेत. एकसारखी लक्षणे नसणे हेच याचे वैशिष्ट्य.घसा खवखवण्यापासून झालेल्या लक्षणांचा प्रारंभ दीर्घकाळ चाललेल्या खोकल्यामध्ये होतो. दम्याच्या रुग्णामध्ये मायकोप्लाझमा न्यूमोनिया तीव्र आणि दीर्घकालीन स्वरूप घेतो.

लक्षणे-

  • अधून मधून खोकल्याची मोठी उबळ . पांढ-या रंगाचा कफ. कफ़ाचे प्रमाण कमी असते.
  • हुडहुडी भरून थंडी वाजणे हे आजाराचे प्रारंभीचे लक्षण आहे.
  • मळमळ किंवा उलट्या

शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास किंवा तिचे संतुलन बिघडल्यास न्युमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. श्वसनमार्गाच्या वरील बाजूस प्रथम संसर्ग होतो किंवा तो सिस्टेमिक म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाचाही असू शकतो. तोंड, घसा किंवा नाकात असलेले जीवाणू अथवा विषाणू फुफ्फुसामध्ये शिरल्यास हा रोग होतो.

न्युमोनिया हा बालकांचा अदृश्य मारेकरी आहे. मलेरिया, गोवर किंवा एड्सने मरणाऱ्या मुलांपेक्षा न्युमोनियामुळे मरणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये न्युमोनियाकोकस या जीवाणूने औषधांना विरोध करायला सुरुवात केली आहे आणि हीच सर्वांत गंभीर बाब आहे.

उपचार

डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते प्रतिजैविक हा योग्य उपचार आहे.