Jump to content

न्यूटाउन (कनेटिकट)

न्यूटाउन हे अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील शहर आहे. हे शहर १७०५मध्ये वसवले गेले. फेरफील्ड काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २७,५६० होती.[] या शहराचा विस्तार ६०.३८ वर्गमैल आहे.

इतिहास

या शहराची जागा १७०५मध्ये पॉह्टाटक या स्थानिक जमातीकडून विकत घेतली गेली. त्यावेळी या वसाहतीचे नाव क्वॉनीपेग असे होते. १८८१ च्या सुमरास येथील लोकसंख्या ४,००० इतकी होती तर १९३० च्या दशकात हा आकडा २,६३५ इतका खाली गेला होता.

उद्योगधंदे

येथे चहाची पाकिटे, कंगवे, अग्निशमन उपकरणे, बटन, टोप्या, कागदी डबे, इ. तयार करण्याचे उद्योग आहेत. याशिवाय जवळ अभ्रक व फेल्डस्पारच्या खाणी आहेत.

हे सुद्धा पहा

  • सॅंडी हूक प्राथमिक शाळेतील हत्याकांड

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Race, Hispanic or Latino, Age, and Housing Occupancy: 2010 Census Redistricting Data (Public Law 94-171) Summary File (QT-PL), Newtown town, Connecticut". U.S. Census Bureau, American FactFinder 2. August 9, 2011 रोजी पाहिले.