न्यू रोशेल (न्यू यॉर्क)
न्यू रोशेल अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील शहर आहे. वेस्टचेस्टर काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७७,०६२ होती.
फ्रांसमधून परागंदा झालेल्या हुगेनो लोकांनी १६८८साली येथे पहिल्यांदा वस्ती केली होती. ला रोशेल या फ्रांसमधील शहरातून आलेल्या या लोकांनी या वस्तीला आपल्या मूळ शहराची आठवण म्हणून न्यू रोशेल असे नाव दिले.