Jump to content

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, १९८४

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, १९८४
नेदरलँड्स महिला
न्यू झीलंड महिला
तारीख८ ऑगस्ट १९८४
संघनायकअनिता व्हान लीयरडेबी हॉक्ली
एकदिवसीय मालिका
निकालन्यू झीलंड महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ८ ऑगस्ट १९८४ रोजी एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. हा न्यू झीलंड महिलांचा पहिला नेदरलँड्स दौरा होता. नेदरलँड्स महिला संघाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. हा दौरा न्यू झीलंड महिलांच्या १९८४ इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच झाला.

नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाला स्थापना होऊन ५० वर्षे झाल्याने हा एकमेव सामना अयोजित केला गेला होता. बाबेट व्हान थिउनेनब्रूक हिला सोडून सर्व नेदरलँड्स संघातील खेळाडूंनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. बाबेट यापूर्वी १९८२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघाकडून १ महिला एकदिवससीय सामना खेळला होता. या सामन्याद्वारे बाबेटने नेदरलँड्सतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

हार्लेम शहरातील स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी या मैदानावर ८ ऑगस्ट १९८४ रोजी झालेल्या एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने ६७ धावांनी विजय मिळवला.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

एकमेव महिला एकदिवसीय सामना

८ ऑगस्ट १९८४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८४/६ (५५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११७/९ (५५ षटके)
डायना कार्ड ४५
कॉर व्हान देर फ्लायर ४/२४ (११ षटके)
न्यू झीलंड महिला ६७ धावांनी विजयी.
स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • ५५ षटकांचा सामना.
  • नेदरलँड्स महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • नेदरलँड्समध्ये खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • नेदरलँड्स आणि न्यू झीलंड ह्या देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • न्यू झीलंडने नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडने नेदरलँड्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मिकी डी बोअर, चांटल ग्रीवर्स, सस्किआ केइझर-क्लीन, डोरीन लोमन, बार्बरा मीहुइझेन, लॉन्नेके ऑफेनबर्ग, आयरेन स्कोफ, कॉर व्हान देर फ्लायर, अनिता व्हान लीयर आणि लीझबेथ वेरनाउट (ने) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • पूर्वी आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघाकडून खेळल्यानंतर बाबेट व्हान थिउनेनब्रूक हिने या सामन्याद्वारे नेदरलँड्स महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.