Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
भारत
न्यू झीलंड
तारीख२२ सप्टेंबर – २९ ऑक्टोबर २०१६
संघनायकविराट कोहली (कसोटी)
महेंद्रसिंग धोणी (ए.दि.)
केन विल्यमसन
रॉस टेलर (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाचेतेश्वर पुजारा (३७३) ल्युक रॉंची (२००)
सर्वाधिक बळीरविचंद्रन अश्विन (२७) ट्रेंट बोल्ट (१०)
मिचेल सॅंटनर (१०)
मालिकावीररविचंद्रन अश्विन (भा)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावाविराट कोहली (३५८) टॉम लॅथम (२४४)
सर्वाधिक बळीअमित मिश्रा (१५) टीम साउथी (७)
मालिकावीरअमित मिश्रा (भा)

न्यू झीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[][][] कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडचा दणदणीत पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात टाकली.

एप्रिल २०१६, रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले होते की कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाईल.[] त्यावर प्रतिक्रिया देताना न्यू झीलंड क्रिकेटने नमूद केले की "त्याआधी इतर बऱ्याच गोष्टींना अंतिम स्वरूप देणे बाकी आहे".[] जून २०१६, मध्ये भारताने २०१६/१७ च्या मोसमासाठी वेळापत्रक जाहीर केले, परंतु त्यात कोठेही दिवस/रात्र कसोटीबद्दल नमूद केले नव्हते.[] परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की कोलकातामधील सामना दिवस/रात्र होणार आहे.[][] परंतु यानंतर जूनच्या शेवटी सामन्यांच्या तारखांची घोषणा झाली, आणि बीसीसीआयने नमूद केले की सर्व कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार ९:३० वाजता सुरू होतील.[] सप्टेंबर २०१६ मध्ये, बीसीसीआयने २०१६-१७ मोसमातील कोणतीही कसोटी दिवस/रात्र खेळवली जाणार नाही ह्या वृत्ताला पुष्टी दिली.[१०][११]

सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीसीआयने १९ ऑक्टोबर रोजी निर्धारित असलेला दुसरा एकदिवसीय सामना करवा चौथमुळे २० ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा निर्णय घेतला.[१२][१३] कानपूर येथे होणारा पहिला कसोटी सामना हा भारताचा ५०० कसोटी सामना असेल.[१४] धरमशाला येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[१५]

दुसरी कसोटी संपल्या नंतर, लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठविली आहेत अशा बातम्या आल्या.[१६] त्यानंतर बीसीसीआयने दौऱ्यावरील उर्वरीत सामने रद्द होण्याची भिती व्यक्त केली.[१७] न्यू झीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले, संघ दौरा चालूच ठेवेल आणि सध्या इंदूरला जायची तयारी करत आहे.[१८] लोढा समितीने त्यांचे म्हणणे स्पष्ट करताना सांगितले की बीसीसीआयची कोणतीही खाती गोठवण्यात आलेली नाहीत, परंतु मंडळाशी संलग्न राज्य संघटनांना पैसे देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.[१९][२०]

कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या कसोटीसह मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली. असा मान मिळवणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णदार ठरला.[२१]

संघ

कसोटी एकदिवसीय
भारतचा ध्वज भारत[२२][२३]न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[२४]भारतचा ध्वज भारत[२५][२६]न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[२७]

सराव सामना

१६-१८ सप्टेंबर
धावफलक
न्यूझीलॅंडर्स न्यूझीलंड
वि
३२४/७घो (७५ षटके)
टॉम लॅथम ५५ (९७)
बलविंदरसिंग संधू २/२१ (११ षटके)
४६४/८घो (११४ षटके)
सुर्यकुमार यादव १०३ (८६)
इश सोधी २/१३२ (२० षटके)
२३५ (६६.४ षटके)
ल्युक रॉंची १०७ (११२)
परिक्षित वालसांगकर ३/४१ (१२.४ षटके)
सामना अनिर्णित
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अनिल चौधरी (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
  • नाणेफेक: मुंबई, गोलंदाजी
  • प्रत्येकी १५ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)


कसोटी सामने

१ली कसोटी

२२-२६ सप्टेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३१८ (९७ षटके)
मुरली विजय ६५ (१७०)
ट्रेंट बोल्ट ३/६७ (२० षटके)
२६२ (९५.५ षटके)
केन विल्यमसन ७५ (१३७)
रविंद्र जडेजा ५/७३ (३४ षटके)
३७७/५घो (४७ षटके)
चेतेश्वर पुजारा ७८ (१५२)
मिचेल सॅंटनर २/७९ (३२.२ षटके)
२३६ (८७.३ षटके)
ल्युक रॉंची ८० (१२०)
रविचंद्रन अश्विन ६/१३२ (३५.३ षटके)
भारत १९७ धावांनी विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रविंद्र जडेजा (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • २ऱ्या दिवशी चहापानापुर्वी आलेल्या पावसामुळे थांबवण्यात आला आणि शेवटच्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही.[३४]
  • भारताचा ५०० वा कसोटी सामना.[१४]
  • कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद २०० बळी पूर्ण करणारा (३८ कसोटी) रविचंद्रन अश्विन (भा) हा दुसरा गोलंदाज.[३५][३६]


२री कसोटी

३० सप्टेंबर–४ ऑक्टोबर
धावफलक
भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३१६ (१०४.५ षटके)
चेतेश्वर पुजारा ८७ (२१९)
मॅट हेन्री ३/४६ (२० षटके)
२०४ (५३ षटके)
जीतन पटेल ४७ (४७)
भुवनेश्वर कुमार ५/४८ (१५ षटके)
२६३ (७६.५ षटके)
रोहित शर्मा ८२ (१३२)
ट्रेंट बोल्ट ३/३८ (१७.५ षटके)
१९७ (८१.१ षटके)
टॉम लॅथम ७४ (१४८)
रविंद्र जडेजा ३/४१ (२० षटके)
भारत १७८ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: वृद्धिमान साहा (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • २ऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात पावसामुळे २ तासाचा खेळ वाया गेला.
  • भारतीय संघाचा मायदेशी २५०वा कसोटी सामना.[३७][३८]
  • केन विल्यमसनला ताप आल्यामुळे त्याच्याऐवजी रॉस टेलरने कर्णधाराची भूमिका पार पाडली.[३९]
  • ह्या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघ आयसीसी अजिंक्यपद स्पर्धा क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला.[४०]


३री कसोटी

८-१२ ऑक्टोबर २०१६
धावफलक
भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५५७/५घो (१६९ षटके)
विराट कोहली २११ (३६६)
ट्रेंट बोल्ट २/११३ (३२ षटके)
२९९ (९०.२ षटके)
मार्टिन गुप्टिल ७२ (१४४)
रविचंद्रन अश्विन ६/८१ (२७.२ षटके)
२१६/३घो (४९ षटके)
चेतेश्वर पुजारा १०१* (१४८)
जीतन पटेल २/५६ (१४ षटके)
१५३ (४४.५ षटके)
रॉस टेलर ३२ (२५)
रविचंद्रन अश्विन ७/५९ (१३.५ षटके)
भारत ३२१ धावांनी विजयी
होळकर क्रिकेट मैदान, इंदूर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • या मैदानावर खेळवली जाणारी पहिलीच कसोटी.[४१]
  • कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण करणारा अजिंक्य रहाणे हा भारताचा ३६वा फलंदाज.[४२][४३]
  • कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून दोन द्विशतके करणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय.[४४][४५]
  • विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची ३६५ धावांची भागीदारी ही भारतातर्फे चवथ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी होय.[४५][४६]
  • रविचंद्रन अश्विनची (भा) कसोटी डावातील तसेच कसोटी सामन्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[४७][४८]
  • धावांच्या दृष्टीने, कसोटी इतिहासात भारताचा दुसरा सर्वात मोठा विजय तर न्यू झीलंडचा दुसरा सर्वात मोठा पराभव[४९]


एकदिवसीय मालिका

१ला सामना

१६ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९० (४३.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९४/४ (३३.१ षटके)
टॉम लॅथम ७९* (९८)
हार्दिक पंड्या ३/३१ (७ षटके)
विराट कोहली ८५* (८१)
इश सोधी १/३४ (४.१ षटके)
भारत ६ गडी व १०१ चेंडू राखून विजयी
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान, धरमशाला
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: हार्दिक पंड्या (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: हार्दिक पंड्या (भा).
  • हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना असून इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वात जास्त एकदिवसीय सामने भारतीय संघ खेळला आहे.[१५]
  • अमित मिश्रचे (भा) ५० एकदिवसीय बळी पूर्ण.
  • डावामध्ये संघ सर्वबाद होवून शेवटपर्यंत नाबाद राहणारा टॉम लॅथम हा एकूण दहावा तर न्यू झीलंडचा पहिलाच फलंदाज[५०]


२रा सामना

२० ऑक्टोबर
१३ः३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४२/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३६ (४९.३ षटके)
केन विल्यमसन ११८ (१२८)
जसप्रित बुमराह ३/३५ (१० षटके)
केदार जाधव ४१ (३७)
टिम साऊथी ३/५२ (९.३ षटके)
न्यू झीलंड ६ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: केन विल्यमसन(न्यू)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • हा भारताचा ४००वा एकदिवसीय पराभव असून कोणत्याही संघापेक्षा सर्वात जास्त एकदिवसीय पराभव भारतीय संघाच्या नावावर.[५१]
  • रोहित शर्माचा (भा) १५०वा एकदिवसीय सामना.[५१]
  • यष्टिरक्षक म्हणून ल्युक रॉंचीचे (न्यू) १०० बळी पूर्ण.[५१]
  • आठ किंवा त्याहून जास्त एकदिवसीय शतके काढणारा केन विल्यमसन हा न्यू झीलंडचा पाचवा फलंदाज. तसेच भारताविरुद्ध शतक करणारा तो न्यू झीलंडचा तिसरा कर्णधार आणि भारतामध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज.[५१]
  • १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारतात एकदिवसीय विजय आणि फिरोजशहा कोटला मैदानावर पहिलाच विजय.[५१]


३रा सामना

२३ ऑक्टोबर
१३ः३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८५ (४९.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२८९/३ (४८.२ षटके)
टॉम लॅथम ६१ (७२)
केदार जाधव ३/२९ (५ षटके)
विराट कोहली १५४* (१३४)
मॅट हेन्री २/५६ (९.२ षटके)
भारत ७ गडी व १० चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • जेम्स नीशॅम आणि मॅट हेन्री दरम्यानची ८४ धावांची भागीदारी ही न्यू झीलंडतर्फे ९व्या गड्यासाठीची सर्वोच्च एकदिवसीय भागीदारी.[५२]
  • महेंद्रसिंग धोणीच्या ९,००० एकदिवसीय धावा पूर्ण. तसेच त्याचा भारतातर्फे एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षट्कार आणि कर्णधारातर्फे सर्वाधिक षट्कार मारण्याचा विक्रम.[५३]
  • विराट कोहलीचे (भा) २६वे एकदिवसीय शतक. ह्या मैदानावरील ही कोणत्याही फलंदाजातर्फे सर्वोच्च धावसंख्या (१५४ धावा).
  • विराट कोहलीचे हे यशस्वी पाठलागामधील १४वे शतक. ही त्याची संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकाची कामगिरी.[५४]
  • विराट कोहलीच्या मायदेशी सर्वात कमी डावांमध्ये ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण.(६३ डाव)[५४]
  • एकदिवसीय क्रिकेट मध्ये १५० यष्टिचीत करणारा महेंद्रसिंग धोणी हा पहिलाच यष्टिरक्षक.[५४]


४था सामना

२६ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६०/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४१ (४८.४ षटके)
मार्टिन गुप्टिल ७२ (८४)
अमित मिश्रा २/४१ (१० षटके)
अजिंक्य रहाणे ५७ (७०)
टिम साऊथी ३/४० (९ षटके)
न्यू झीलंड १९ धावांनी विजयी
जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, रांची
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मार्टिन गुप्टिल (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी


५वा सामना

२९ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२६९/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
७९ (२३.१ षटके)
रोहित शर्मा ७० (६५)
ट्रेंट बोल्ट २/५२ (१० षटके)
केन विल्यमसन २७ (४०)
अमित मिश्रा ५/१८ (६ षटके)
भारत १९० धावांनी विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम
पंच: सी. के. नंदन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: अमित मिश्रा (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: जयंत यादव (भा).
  • सी. के. नंदन (भा) यांचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ही न्यू झीलंडची भारताविरुद्ध सर्वात लहान धावसंख्या आहे तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांचा सर्वात लहान पूर्ण झालेला डाव आहे.[५५]
  • अमित मिश्राची ह्या सामन्यातील कामगिरी ही भारतीय गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील न्यू झीलंडविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[५६]
  • विराट कोहलीच्या मालिकेमधील ३५८ धावा ह्या कोणत्याही फलंदाजातर्फे भारत-न्यू झीलंड दरम्यानच्या मालिकेतील सर्वात जास्त धावा.[५६]


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "क्रिकेट: प्लीज सेव्ह अस फ्रॉम ग्राऊंडहॉग डे" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "भारतीय क्रिकेट वेळापत्रक २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "'भारत न्यू झीलंडविरूद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्याचे आयोजन करणार'" (इंग्रजी भाषेत). २१ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "दिवस-रात्र कसोटी अजून नक्की झालेली नाही – न्यू झीलंड क्रिकेट" (इंग्रजी भाषेत). २२ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "बीसीसीआयची मायदेशी मोसमाची घोषणा: १३ कसोटी आणि ६ नवीन मैदाने" (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "इडन गार्डनवर न्यू झीलंडविरूद्ध होणार भारताचा पहिला दिवस/रात्र कसोटी सामना" (इंग्रजी भाषेत). १० जून २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "इडन गार्डनवर भारताचा पहिला दिवस/रात्र कसोटी सामना" (इंग्रजी भाषेत). १० जून २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "भारत-न्यू झीलंड मालिकेत दिवस-रात्र कसोटी नाही" (इंग्रजी भाषेत). २८ जून २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "यंदा गुलाबी चेंडूने कसोटी नाही". २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  11. ^ "ह्या मोसमात मायदेशातील कोणतीही कसोटी दिवस-रात्र नाही - ठाकूर" (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "भारत-न्यू झीलंड दुसरा एकदिवसीय सामना २० ऑगस्टला होणार". क्रिकटोटल (इंग्रजी भाषेत). ९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "दिल्लीचा एकदिवसीय सामना २० ऑक्टोबरला ढकलला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ a b "महत्त्वाच्या मोसमाची सुरवात महत्त्वाच्या कसोटीने". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ a b "कसोटीतील मरगळ दूर सारण्याची न्यू झीलंडला संधी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "भारतीय बोर्डाची बँक खाती गोठवली, न्यू झीलंड दौराविषयी शंका - बातमी". द गार्डियन (इंग्रजी भाषेत). ४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "नाराज बीसीसीआय सध्या सुरू असलेली भारत-न्यू झीलंड मालिका रद्द करणार". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  18. ^ "बीसीसीआय वर कोसळलेल्या आपत्तीमुळे किवींचा भारतीय दौरा रद्द होणार". स्टफ (इंग्रजी भाषेत). ४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  19. ^ "बीसीसीआयची खाती गोठवली नाहीत: लोढा". महाराष्ट्र टाइम्स. 2016-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  20. ^ "बीसीसीआयकडून दिशाभूल : लोढा समितीचा आरोप". महाराष्ट्र टाइम्स. 2016-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "सर्वोत्तम कसोटी संघाचा भारताला मान". महाराष्ट्र टाइम्स. 2016-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ "न्यू झीलंड विरुद्ध कसोटीसाठी रोहितला संधी". 2016-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  23. ^ "न्यू झीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संपूर्ण ताकदीचा संघ" (इंग्रजी भाषेत). १२ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  24. ^ "न्यू झीलंडच्या कसोटी संघात निशॅमचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत). ५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  25. ^ "सुरेश रैनाचे पुनरागमन". 2016-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  26. ^ "पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी अश्विन, जडेजा, शमीला विश्रांती" (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  27. ^ "विशेषज्ञ फलंदाज म्हणून ॲंडरसनचे न्यू झीलंड संघात पुनरागमन" (इंग्रजी भाषेत). १९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  28. ^ "भारताविरुद्ध कसोटी संघातून साऊथी बाहेर, हेन्रीची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  29. ^ "साईड स्ट्रेनमुळे क्रेग कसोटी मालिकेबाहेर, पटेलचा बदली खेळाडू म्हणून विचार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ a b "गंभीरचे दोन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ "धवनला दुखापत, गंभीर इंदूर कसोटीत खेळण्याची शक्यता". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ "दुखापतग्रस्त भुवेश्वर ऐवजी शार्दूल ठाकूर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  33. ^ "महत्त्वाच्या कसोटी गोलंदाजांना विश्रांती". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  34. ^ "पावसाचा व्यत्यय आलेल्या दिवशी विल्यमसन आणि लॅथमची मजबूत फलंदाजी". इएसपीएन स्पोर्ट मिडीया (इंग्रजी भाषेत).
  35. ^ "अश्विन जलद २००". २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  36. ^ "वेगवान २०० कसोटी बळी घेणार्‍या गोलंदाजांमध्ये अश्विन दुसर्‍या क्रमांकावर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  37. ^ "भारताच्या घरच्या २५० व्या कसोटीसाठी इडन गार्डन हे एक योग्य व्यासपीठ". २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  38. ^ "भारत वि न्यू झीलंड, २री कसोटी, कोलकाता: २५०व्या कसोटीसह मालिकाविजयावर भारताचे लक्ष् - टाईम्स ऑफ इंडीया". २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  39. ^ "विल्यमसनच्या गैरहजेरीत हेन्रीने केले न्यू झीलंडच्या लढ्याचे नेतृत्व". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  40. ^ "२-० आघाडीमुळे भारतला कसोटी क्रमवारीत पुन्हा अग्रस्थान". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  41. ^ "भारताचे लक्ष्य व्हाईटवॉशकडे, तर न्यू झीलंडचे विल्यमसनसोबत तगडा प्रतिकार करण्यातचे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  42. ^ "कोहली गांगूलीच्या पुढे, धोणी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  43. ^ "विराट कोहलीचे शतक". महाराष्ट्र टाइम्स. 2016-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  44. ^ "कोहली, रहाणेच्या ३६५ धावांच्या भागीदारीने भारताचा वरचष्मा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  45. ^ a b "कोहलीचा 'विराट' पराक्रम, रहाणेनंही मैदान गाजवलं". महाराष्ट्र टाइम्स. 2016-10-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  46. ^ "भारताची सर्वोत्तम चवथ्या गड्यासाठीची भागीदारी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  47. ^ "अश्विनच्या कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीने न्यू झीलंडला ३-० व्हाईटवॉश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  48. ^ "भारत वि न्यू झीलंड, ३री कसोटी, इंदूर: १५३ बळी आणि मोजणी सुरुच, अश्विन घरच्या मायदेशी मोठा". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  49. ^ "३२१: भारताचा धावांनी दुसरा सर्वात मोठा कसोटी विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  50. ^ "न्यू झीलंड १९० धावांमध्ये सर्वबाद, लॅथमची शेवटपर्यंत नाबाद". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  51. ^ a b c d e "भारत वि न्यू झीलंड - २रा एकदिवसीय सामना: आकडेवारी". स्पोर्ट्स किडा (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  52. ^ "क्रिकेट नोंदी - विक्रम - न्यू झीलंड - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - विकेटनुसार सर्वोच्च भागीदारी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  53. ^ "धोनीच्या ९००० धावा: २४४ डाव, १०१०९ चेंडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  54. ^ a b c "भारत वि न्यू झीलंड तिसरा एकदिवसीय सामना आकडेवारी: कोहलीच्या दर्जेदार कामगिरीने भारत २-१ ने आघाडीवर". स्पोर्ट्स कीडा (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  55. ^ "मिश्राच्या ५ बळींमुळे न्यू झीलंडचा ७९ धावांत खुर्दा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  56. ^ a b "मिश्रा सेकंड ओन्ली टू मिश्रा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३