न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३ | |||||
पाकिस्तान | न्यू झीलंड | ||||
संघनायक | बाबर आझम | टिम साउथी (कसोटी) केन विल्यमसन (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | सरफराज अहमद (३३५) | टॉम लॅथम (२८१) | |||
सर्वाधिक बळी | अब्रार अहमद (११) | इश सोधी (१३) | |||
मालिकावीर | सरफराज अहमद (पा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद रिझवान (१८२) | केन विल्यमसन (१६४) | |||
सर्वाधिक बळी | नसीम शाह (८) | टिमोथी साउथी (६) | |||
मालिकावीर | डेव्हन कॉन्वे (न्यू) |
न्यू झीलंड क्रिकेट संघ डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ मध्ये दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करत आहे.[१][२] कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग बनतील आणि एकदिवसीय सामने २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनतील.[३]
एप्रिल २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने पुष्टी केली की ही मालिका होणार आहे.[४][५] या दौऱ्यानंतर, सप्टेंबर २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आलेल्या मालिकेची भरपाई म्हणून पाच एकदिवसीय सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी न्यू झीलंड एप्रिल २०२३ मध्ये पाकिस्तानला परतणार आहे[६][७]
ऑक्टोबर २०२२ मध्ये, पीसीबीने दौऱ्यासाठी सामने जाहीर केले.[८] सुरुवातीला, दुसरी कसोटी मुलतान येथे खेळली जाणार होती,,[९] परंतु नंतर मुलतानमधील खराब हवामानामुळे कराचीला हलविण्यात आली.[१०] २४ डिसेंबर २०२२ रोजी, पीसीबीने सुधारित सामन्यांची पुष्टी केली की सर्व सामने कराचीमध्ये खेळवले जातील.[११]
कसोटी मालिकेच्या आधी, केन विल्यमसनने आपल्या भूमिकेतून पायउतार झाल्यानंतर,[१२] टिम साउथीची न्यू झीलंडचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.[१३]
पथके
कसोटी | ए.दि. | ||
---|---|---|---|
पाकिस्तान[१४] | न्यूझीलंड[१५] | पाकिस्तान[१६] | न्यूझीलंड[१७] |
|
|
२४ डिसेंबर २०२२ रोजी, मिर हमझा, साजिद खान आणि शाहनवाझ दहानी यांना पाकिस्तानच्या कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले.[१८] न्यू झीलंडचा ॲडम मिल्ने दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी ब्लेर टिकनरचा समावेश करण्यात आला होता.[१९]
कसोटी मालिका
१ली कसोटी
२६–३० डिसेंबर २०२२ धावफलक |
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
२री कसोटी
२–६ जानेवारी २०२३ धावफलक |
न्यूझीलंड | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी
- सौद शकीलचे (पा) क्रिकेटमध्ये पहिले शतक.
एकदिवसीय मालिका
१ला आं. ए. दि. सामना
न्यूझीलंड २५५/९ (५० षटके) | वि | पाकिस्तान २५८/४ (४८.१ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
- उसामा मीर (पा) आणि हेन्री शिपले (न्यू) या दोघांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- विश्वचषक सुपर लीग गुण: पाकिस्तान १०, न्यू झीलंड ०.
२रा आं. ए. दि. सामना
न्यूझीलंड २६१ (४९.५ षटके) | वि | न्यूझीलंड १८२ (४३ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड १०, पाकिस्तान ०.
३रा आं. ए. दि. सामना
पाकिस्तान २८०/९ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २८१/८ (४८.१ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- कामरान गुलाम (पा) ह्याने हॅरीस सोहेलचा बदली खेळाडू म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[२१]
- विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड १०, पाकिस्तान ०.
संदर्भयादी
- ^ "ब्लॅककॅप्स २०२२-२३ मध्ये दोन वेळा पाकिस्तानचा दौरा करणार". न्यू झीलंड क्रिकेट. 2021-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड २०२२-२३ मध्ये दोनदा पाकिस्तानचा दौरा करणार आहे". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ब्लॅककॅप्स २०२२/२३ मध्ये दोन वेळा पाकिस्तानचा दौरा करणार". स्टफ. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इंग्लंड, न्यू झीलंड पाकिस्तानचा दौरा करणार". क्रिकबझ्झ. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान क्रिकेट संघासाठी १२ व्यस्त महिन्यांचे वेळापत्रक जाहीर". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पुढे ढकलण्यात आलेल्या मालिकेची भरपाई करण्यासाठी न्यू झीलंड २०२२-२३ मध्ये दोनदा पाकिस्तानचा दौरा करणार आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड २०२२-२३ मध्ये दोनदा पाकिस्तानला परतणार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पीसीबीकडून पाकिस्तानमध्ये न्यू झीलंडच्या दोन कसोटी, आठ एकदिवसीय आणि पाच टी२० सामन्यांचे तपशील उघड". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान विरुद्ध न्यू झीलंड मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान विरुद्ध न्यू झीलंड यांच्यातील दुसरी कसोटी हवामानाच्या चिंतेमुळे मुलतानहून कराचीला हलवली गेली". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान विरुद्ध न्यू झीलंड मालिकेचे अद्यतनित वेळापत्रक". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "विल्यमसन कसोटी कर्णधारपदावरून पायउतार, साऊथीची नियुक्ती". न्यू झीलंड क्रिकेट. 2022-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंडतर्फे पाकिस्तानसाठी नवा कसोटी संघ जाहीर साउथी करणार नेतृत्व". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड कसोटीसाठी पाकिस्तानने हसन अलीला परत बोलावले, शाहीन अद्याप बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "सोधी आणि फिलिप्सचे कसोटी संघात पुनरागमन, टिकनर कायम". न्यू झीलंड क्रिकेट. 2022-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "हरिस सोहेल, फखर जमान यांचे न्यू झीलंड वनडेसाठी पाकिस्तान संघात पुनरागमन". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "वेगवेगळे कर्णधार, न्यू झीलंडने पाकिस्तान, भारत दौऱ्यासाठी एकदिवसीय संघांची नावे जाहीर, प्रमुख खेळाडूंना परत बोलावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड कसोटीसाठी पाकिस्तान संघात साजिद खानसह तीन खेळाडूंचा समावेश". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ॲडम मिल्नेची न्यू झीलंडच्या पाकिस्तान आणि भारतातील एकदिवसीय मालिकेतून माघार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "सोधीज मेडन फाइफर कीप्स न्यू झीलंड इन द हंट". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान वि न्यू झीलंड : कामरान गुलामला हरिस सोहेलसाठी पर्याय म्हणून नाव देण्यात आले". क्रिकट्रॅकर. १४ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.