न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७६-७७
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७६-७७ | |||||
पाकिस्तान | न्यू झीलंड | ||||
तारीख | ९ ऑक्टोबर – ४ नोव्हेंबर १९७६ | ||||
संघनायक | मुश्ताक मोहम्मद | ग्लेन टर्नर (१ली,२री कसोटी, ए.दि.) जॉन पार्कर (३री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७६ मध्ये तीन कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. आशिया खंडात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. अटीतटीच्या झालेला एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना न्यू झीलंडने एका धावेने जिंकला. यजमान पाकिस्तानचे नेतृत्व मुश्ताक मोहम्मद याने केले.
पुढे जाऊन एक प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू बनलेला पाकिस्तानचा जावेद मियांदाद याने या दौऱ्यात पहिल्या कसोटीद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
९-१३ ऑक्टोबर १९७६ धावफलक |
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- जावेद मियांदाद (पाक), रॉबर्ट अँडरसन, वॉरेन लीस आणि पीटर पेथेरिक (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२३-२७ ऑक्टोबर १९७६ धावफलक |
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
४/० (०.५ षटके) सरफ्राज नवाझ ४* |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- फरुख झमान (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
३० ऑक्टोबर - ४ नोव्हेंबर १९७६ धावफलक |
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- शहीद इस्रार, सिकंदर बख्त (पाक) आणि मरे पार्कर (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
एकमेव एकदिवसीय सामना
१६ ऑक्टोबर १९७६ धावफलक |
न्यूझीलंड १९८/८ (३५ षटके) | वि | पाकिस्तान १९७/९ (३५ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- पाकिस्तानी भूमीवर खेळवला गेलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.
- पाकिस्तानात न्यू झीलंडने प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- रॉबर्ट अँडरसन, मरे पार्कर, अँड्रु रॉबर्ट्स आणि गॅरी ट्रूप (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.