न्यू इंग्लंड
न्यू इंग्लंड हा अमेरिकेतील अति-ईशान्येकडील एक भौगोलिक प्रदेश आहे. न्यू इंग्लंड प्रदेशात सध्याची मॅसेच्युसेट्स, मेन, व्हरमॉंट, न्यू हॅम्पशायर, कनेटिकट व ऱ्होड आयलंड ही राज्ये येतात.
न्यू इंग्लंड ही अमेरिकेतील ब्रिटिशांची सर्वात जुनी वसाहत आहे. ब्रिटिश खलाशी येथे १६२० सालापासुन वसले आहेत. न्यू इंग्लंडमध्ये अमेरिकन साहित्य व तत्त्वज्ञानाचे पहिले घडे पडले, तसेच अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीची सुरुवात देखील येथेच झाली. त्यामुळे अमेरिकेच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक इतिहासात न्यू इंग्लंडला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
न्यू इंग्लंड प्रदेशाचे क्षेत्रफळ १,८६,४५९ वर्ग किमी तर एकूण लोकसंख्या १,४३,०३,५४२ आहे.
मोठी शहरे
- बोस्टन
- प्रॉव्हिडन्स
- हार्टफर्ड, कनेटिकट