न्यायदर्शन
न्याय दर्शन हे सहा आस्तिक भारतीय दर्शनशत्रांपैकी एक दर्शनशास्त्र आहे. गौतमांनीं पांच अध्याय न्यायसूत्रें केली आहेत. त्यांत युक्ति प्रधान आहे. युक्तीनें पुरुषाची बुद्धि तीव्र होते. तिचा मननामध्यें उपयोग आहे. म्हणून युक्तिप्रधान न्यायसूत्रांचेहि मननद्वारां वेदान्तजन्य ज्ञानच फल आहे. आणि कणादमुनिकृत दहा अध्याय वैशेषिक सूत्रें असून, त्यांचा न्यायांत अंतर्भाव आहे.