Jump to content

नोव्हाक जोकोविच

नोव्हाक जोकोविच
Новак Ђоковић (सर्बियन)

२०१४ रोम मास्टर्स दरम्यान
देशसर्बिया ध्वज सर्बिया
वास्तव्यमोनॅको
जन्म २२ मे, १९८७ (1987-05-22) (वय: ३७)
बेलग्रेड, सर्बिया (तत्कालीन युगोस्लाव्हिया)
उंची १.८८ मी (६ फु २ इं)
सुरुवात इ.स. २००३
शैली उजव्या हाताने; बॅकहँड दोन्ही हातांनी
बक्षिस मिळकत १४९ दशलक्ष अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन 1116–220
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
पहिला (४ जुलै २०११)
क्रमवारीमधील सद्य स्थान पहिला (१४ जून २०२१)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२००८, २०११, २०१२, २०१३, २०१५,२०१६, २०१९, २०२०, २०२१)
फ्रेंच ओपन विजयी (२०१६, २०२१)
विंबल्डनविजयी (२०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९)
यू.एस. ओपनविजयी (२०११, २०१५, २०१८)
इतर स्पर्धा
टूर फायनल्स
दुहेरी
प्रदर्शन ३१ - ४४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
११४ (३० नोव्हेंबर, इ.स. २००९)
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१५.


ऑलिंपिक पदक माहिती
सर्बियासर्बिया या देशासाठी खेळतांंना
टेनिस - पुरुष
कांस्य२००८ बीजिंगएकेरी

नोव्हाक जोकोविच (सर्बियन: Новак Ђоковић, Novak Đoković;) (२२ मे, इ.स. १९८७; बेलग्रेड, युगोस्लाव्हिया - हयात) हा एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. नोलजोकर ह्या टोपणनावांनी ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११, २०१२, २०१३ ,२०१५ ,२०१६, २०१९, २०२० व २०२१ साली ऑस्ट्रेलियन ओपन, २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९ साली विंबल्डन व २०११, २०१५ व २०१८ साली यू.एस. ओपन आणि २०१६ व २०२१ साली (फ्रेंच ओपन) ह्या १९ ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा आतापर्यंत जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिस खेळाडू आहे. तसेच २०१० साली सर्बियाला डेव्हिस करंडक जिंकून देणाऱ्या संघामध्ये जोकोविच होता.

२०११ व २०१५ ही वर्षे जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरली आहेत. त्याने २०११ सालामध्ये ७० एकेरी सामने जिंकले व केवळ ६ सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना जॉन मॅकएन्रोच्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २०११ व २०१५ ह्या दोन्ही वर्षांमध्ये त्याने प्रत्येकी ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिस खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याने २०११ मध्ये विक्रमी ५ ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिस खेळाडू रफायेल नदालला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २०१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील ऑस्ट्रेलियन ओपन ह्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले.

सर्बिया, बाल्कन तसेच भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या देशांमधील तो सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानला जातो. जोकोविचला आजवर अनेक सर्बियन राष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले आहेत. पीट सॅम्प्रास ह्या माजी अव्वल टेनिस खेळाडूने आजवर पाहिलेला सर्वोत्तम टेनिस खेळाडू असे जोकोविचचे वर्णन केले आहे.

जोकोविच आपल्या तडाखेबाज खेळासोबत खेळकर स्वभावासाठी देखील लोकप्रिय आहे. इतर टेनिस खेळाडूंच्या नकला करणे तसेच सामन्यादरम्यान तसेच सामना संपल्यानंतर टिवल्याबावल्या करणे इत्यादी विनोदी उद्योगात तो पारंगत आहे.

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या: १८ (१० - ८)

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता२००७यू.एस. ओपनहार्डस्वित्झर्लंड रॉजर फेडरर६–७(४–७), ६–७(२–७), ४–६
विजेता२००८ऑस्ट्रेलियन ओपनहार्डफ्रान्स जो-विल्फ्रेद सॉंगा४–६, ६–४, ६–३, ७–६(७–२)
उप-विजेता२०१०यू.एस. ओपन (२)हार्डस्पेन रफायेल नदाल४–६, ७–५, ४–६, २–६
विजेता२०११ऑस्ट्रेलियन ओपन (२)हार्डयुनायटेड किंग्डम अँडी मरे६–४, ६–२, ६–३
विजेता२०११विंबल्डनगवताळस्पेन रफायेल नदाल६–४, ६–१, १–६, ६–३
विजेता२०११यू.एस. ओपन हार्डस्पेन रफायेल नदाल६–२, ६–४, ६–७(३–७), ६–१
विजेता२०१२ऑस्ट्रेलियन ओपन हार्डस्पेन रफायेल नदाल५-७, ६-४, ६-२, ६-७५-७, ७-५
उप-विजेता२०१२फ्रेंच ओपन (1)मातीचेस्पेन रफायेल नदाल4–6, 3–6, 6–2, 5–7
उप-विजेता२०१२यू.एस. ओपन (3)हार्डयुनायटेड किंग्डम अँडी मरे6–7(10–12), 5–7, 6–2, 6–3, 2–6
विजेता२०१३ऑस्ट्रेलियन ओपन (4)हार्डयुनायटेड किंग्डम अँडी मरे6–7(2–7), 7–6(7–3), 6–3, 6–2
उप-विजेता२०१३विंबल्डनगवताळयुनायटेड किंग्डम अँडी मरे4–6, 5–7, 4–6
उप-विजेता२०१३यू.एस. ओपन (4)हार्डस्पेन रफायेल नदाल2–6, 6–3, 4–6, 1–6
उप-विजेता२०१४फ्रेंच ओपन (2)मातीचेस्पेन रफायेल नदाल6–3, 5–7, 2–6, 4–6
विजेता२०१४विंबल्डन(2)गवताळस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–7(7–9), 6–4, 7–6(7–4), 5–7, 6–4
विजेता२०१५ऑस्ट्रेलियन ओपन (5)हार्डयुनायटेड किंग्डम अँडी मरे7–6(7–5), 6–7(4–7), 6–3, 6–0
उप-विजेता२०१५फ्रेंच ओपन (3)क्लेस्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका6–4, 4–6, 3–6, 4–6
विजेता२०१५विंबल्डन (3)गवताळस्वित्झर्लंड रॉजर फेडरर7–6(7–1), 6–7(10–12), 6–4, 6–3
Winner२०१५यू.एस. ओपन (2)Hardस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–4, 5–7, 6–4, 6–4
Winner २०१९ ऑस्टेलियन ओपन (६)एली Hard राफेल नदाल

मास्टर्स १००० एकेरी अंतिम फेऱ्या: १७ (१० - ७)

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता२००७इंडियन वेल्सहार्ड कोर्टस्पेन रफायेल नदाल२–६, ५–७
विजेता२००७मायामीहार्ड कोर्टआर्जेन्टिना ग्वियेर्मो कॅन्यास६–३, ६–२, ६–४
विजेता२००७रॉजर्स कपहार्ड कोर्टस्वित्झर्लंड रॉजर फेडरर७–६(७–२), २–६, ७–६(७–२)
विजेता२००८इंडियन वेल्सहार्ड कोर्टअमेरिका मार्डी फिश६–२, ५–७, ६–३
विजेता२००८रोममातीस्वित्झर्लंड स्टॅनिस्लास वावरिंका४–६, ६–३, ६–३
उप-विजेता२००८सिनसिनाटीहार्ड कोर्टयुनायटेड किंग्डम अँडी मरे६–७(४–७), ६–७(५–७)
उप-विजेता२००९मायामीहार्ड कोर्टयुनायटेड किंग्डम अँडी मरे२–६, ५–७
उप-विजेता२००९मोंटे कार्लोमातीस्पेन रफायेल नदाल३–६, ६–२, १–६
उप-विजेता२००९रोममातीस्पेन रफायेल नदाल६–७(२–७), २–६
उप-विजेता२००९सिनसिनाटी (२)हार्ड कोर्टस्वित्झर्लंड रॉजर फेडरर१–६, ५–७
विजेता२००९पॅरिसहार्ड कोर्टफ्रान्स गायेल मॉनफिस६–२, ५–७, ७–६(७–३)
विजेता२०११इंडियन वेल्स (२)हार्ड कोर्टस्पेन रफायेल नदाल४–६, ६–३, ६–२
विजेता२०११मायामी (२)हार्ड कोर्टस्पेन रफायेल नदाल४–६, ६–३, ७–६(७–४)
विजेता२०११माद्रिदमातीस्पेन रफायेल नदाल७–५, ६–४
विजेता२०११रोम (२)मातीस्पेन रफायेल नदाल६–४, ६–४
विजेता२०११रॉजर्स कप(२)हार्ड कोर्टअमेरिका मार्डी फिश६–२, ३–६, ६–४
उप-विजेता२०११सिनसिनाटी(३)हार्ड कोर्टयुनायटेड किंग्डम अँडी मरे४–६, ०–३ ret.

ऑलिंपिक पदके (१ कांस्य)

निकाल क्र. तारीख स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
कांस्य १. १६ ऑगस्ट २००८ चीन बीजिंग ऑलिंपिकहार्ड कोर्ट अमेरिका जेम्स ब्लेक६–३, ७–६(७–४)

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2012-04-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (सर्बियन भाषेत). 2010-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-05 रोजी पाहिले.
  • "नोव्हाक जोकोविच" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
मागील
स्पेन रफायेल नदाल
एटीपी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक
४ जुलै २०११ – चालू
पुढील
विद्यमान