Jump to content

नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन

नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन
Nordrhein-Westfalen
जर्मनीचे राज्य
ध्वज
चिन्ह

नोर्डऱ्हाइन-वेस्टफालनचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
नोर्डऱ्हाइन-वेस्टफालनचे जर्मनी देशामधील स्थान
देशजर्मनी ध्वज जर्मनी
राजधानीड्युसेलडॉर्फ
क्षेत्रफळ३४,०८४ चौ. किमी (१३,१६० चौ. मैल)
लोकसंख्या१,७९,२०,०००
घनता५२५.८ /चौ. किमी (१,३६२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२DE-NW
संकेतस्थळhttp://www.nrw.de/

नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन हे जर्मनी देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. जर्मनीच्या पश्चिम भागातील ऱ्हाइनलॅंड भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालनच्या उत्तरेस नीडरजाक्सन, पूर्वेस हेसेन, दक्षिणेस ऱ्हाइनलांड-फाल्त्स ही जर्मनीची राज्ये तर नैऋत्येस बेल्जियम तर पश्चिमेस नेदरलँड्स हे देश आहेत. ड्युसेलडॉर्फ ही नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन राज्याची राजधानी तर कोलोन हे सर्वात मोठे शहर आहे. ऱ्हाइन ही युरोपातील प्रमुख नदी ह्या राज्याच्या पश्चिम भागातून वाहते.

ऐतिहासिक काळापासून प्रशियाचा भूभाग असलेल्या ऱ्हाइनलॅंडचा उत्तर भाग व वेस्टफालिया हे दोन प्रदेश जोडून दुसऱ्या महायुद्धानंतर ह्या राज्याची निर्मिती करण्यात आली. जर्मनीच्या उद्योगीकरणाची सुरुवात ह्याच भागात झाली. त्यामुळे हे राज्य जर्मनीमधे औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत मानले जाते. आजही येथील रूर प्रदेशामध्ये जर्मनीमधील अनेक मोठे कारखाने आहेत.

मुख्य शहरे

खालील यादीत नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यामधील १ लाखांहून अधिक लोकसंख्या (२०१२ सालची) असलेली शहरे दिली आहेत.

  1. क्योल्न - १०,२४,३७३
  2. ड्युसेलडॉर्फ - ५,९३,६८२
  3. डॉर्टमुंड - ५,७२,०८७
  4. एसेन - ५,६६,८६२
  5. ड्युइसबुर्ग - ४,८६,८१६
  6. बोखुम
  7. वुपर्टाल
  8. बॉन
  9. बीलेफेल्ड
  10. म्युन्स्टर
  11. आखन
  12. म्योन्शनग्लाडबाख
  13. गेल्सनकर्शन
  14. क्रेफेल्ड
  15. ओबरहाउसन
  16. हागेन
  17. हाम
  18. म्युलहाइम
  19. हेर्न
  20. लेफेरकुसन
  21. सोलिंगन
  22. नॉय्स
  23. पाडेबोर्न
  24. रेक्लिंगहाउझन
  25. बोट्रोप
  26. रेम्शाइट
  27. बेर्गिश ग्लाडबाख
  28. म्योर्स
  29. सीगन