Jump to content

नोरा फतेही

नोरा फतेही
2022 मध्ये फतेही
जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ (1992-02-06) (वय: ३२)
कॅनडा[a][][]
राष्ट्रीयत्व कॅनेडियन
कार्यक्षेत्र नर्तक, मॉडेल, अभिनेत्री, गायक, निर्माता
कारकीर्दीचा काळ २०१४ ते आजतागायत

नोरा फतेही (जन्म:६ फेब्रुवारी, १९९२)[][] ही एक कॅनेडियन नर्तक, मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि निर्माती आहे, जी भारतीय चित्रपट सृष्टीत म्हणजे बॉलीवूड मध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. तिने हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने बॉलिवूड चित्रपट रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[][] तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत टेम्पर, बाहुबली: द बिगिनिंग आणि किक-२ सारख्या चित्रपटांमध्ये 'मसाला गीत' (आयटम नंबर) करून लोकप्रियता मिळवली आणि दोन मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले, डबल बॅरल आणि कायमकुलम कोचुन्नी.

इ.स. २०१५ मध्ये, ती 'बिग बॉस -९' या वास्तव प्रदर्शनी (रिअ‍ॅलिटी शो) मध्ये स्पर्धक होती आणि ८४व्या दिवशी तिला बाहेर काढण्यात आले. इ.स. २०१६ मध्ये तिने वास्तव नृत्य प्रदर्शनी 'झलक दिखला जा' मध्ये भाग घेतला. ती सत्यमेव जयते या बॉलिवूड चित्रपटात देखील दिसली, ज्यात ती "दिलबर दिलबर दिलबर"[] गाण्याच्या 'पुनर्निर्मित आवृत्ती'मध्ये दिसली. या पुनर्निर्मिती गाण्याने प्रसारणाच्या (रिलीजच्या) पहिल्या २४तासात यूट्यूबवर २०दशलक्ष दृश्ये ओलांडली. यूट्यूबवरील हे पहिले हिंदी गाणे बनले आहे ज्याने भारतात अशी प्रसिद्धी मिळवली.[] तिने मोरक्कन हिप-हॉप ग्रुप फनेअर सोबत "दिलबर दिलबर दिलबर" गाण्याची अरबी आवृत्ती प्रदर्शित करण्यासाठी देखील सहकार्य केले. २०१९ मध्ये, तिने टांझानियन संगीतकार आणि गीतकार 'रायवानी' यांच्या सहकार्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय इंग्रजी गाणे 'पेपेटा' प्रसारित केले.

नोरा फतेही जुलै 2019 मध्ये मुंबईत तिच्या "बाटला हाऊस " चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान

वैयक्तिक

नोरा फतेही मोरोक्कन कुटुंबातून आलेली असून तिचा जन्म कॅनडामध्ये झाला आहे. विशेष म्हणजे एका मुलाखतीमध्ये तिने असे म्हणले आहे की ती स्वतःला "अंतःकरणाने भारतीय" मानते.[]

कारकीर्द

2017 मध्ये एका कार्यक्रमात फतेही

फतेहीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बॉलिवूड चित्रपट रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन पासून केली आहे. त्यानंतर तिने पुरी जगन्नादच्या तेलुगू चित्रपट 'टेम्पर' मध्ये एक मसाला गीत केले. आणि अशा प्रकारे तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.[१०] तिने इमरान हाश्मी आणि गुरमीत चौधरी यांच्यासोबत विक्रम भट्ट दिग्दर्शित आणि महेश भट्ट निर्मित ‘मिस्टर एक्स’ चित्रपटातही एक विशेष भूमिका केली आहे.

नंतर फतेही ने बाहुबली: द बिगिनिंग आणि किक - २ सारख्या बिग बजेट चित्रपटात देखील मसाला गीत केले आहे.[११][१२][१३]

डिसेंबर २०१५ मध्ये, फतेहीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला जो त्याच्या नवव्या हंगामात वाइल्ड कार्ड एंटरर म्हणून होता.[१४] तिने १२व्या आठवड्यात (दिवस ८३) बेदखल होईपर्यंत बिग बॉसच्या घरात ३ आठवडे घालवले. ती २०१६ मध्ये झलक दिखला जा या स्पर्धेतही सहभागी झाली होती. तिने माय बर्थडे सॉंग चित्रपटात, संजय सूरी सोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका निभावली.[१५][१६]

६ मार्च २०२१ रोजी फतेही ही पहिली आफ्रिकन-अरब महिला कलाकार बनली जिचे "दिलबर" गाणे यूट्यूबवर एक अब्ज व्ह्यूज ओलांडले.[१७]

2019 मध्ये फतेही

इ.स. २०२२ मध्ये, नोराने २०२२ फिफा विश्वचषक अंतिम समारंभात एक परफॉर्मन्स दिला.[१८][१९]

अभिनय सूची

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका भाषा नोट्स
2014 रोअर:टायगर ऑफ सुंदरबन सीजे हिंदी
2015 क्रेझी कुक्कड फॅमिली एमी हिंदी
टेम्पर तेलुगू "इट्टगे रेचीपोडम" गाण्यात विशेष उपस्थिती
मिस्टर एक्स हिंदी "अलिफ से" गाण्यात विशेष उपस्थिती
डबल बॅरल मल्याळम विशेष उपस्थिती
बाहुबली: द बिगिनींग तेलगू / तमिळ " मनोहरी " गाण्यात विशेष उपस्थिती
किक 2 तेलगू "किरुकू किक" गाण्यात विशेष उपस्थिती
शेर तेलगू "नेपरे पिंकी" गाण्यात विशेष उपस्थिती
लोफर तेलगू "नोककी डोचे" गाण्यात विशेष उपस्थिती
2016 रॉकी हँडसम हिंदी "रॉक द पार्टी" गाण्यात विशेष उपस्थिती
ओपिरी / थोझा नेमाली तेलगू / तमिळ "डोअर नंबर" गाण्यात विशेष उपस्थिती
2018 माय बर्थडे सॉंग सँडी हिंदी
सत्यमेव जयते हिंदी "दिलबर दिलबर दिलबर" गाण्यात विशेष उपस्थिती
स्त्री हिंदी "कामारिया" गाण्यात विशेष उपस्थिती
कायमकुलम कोचुनी मल्याळम "नृतगीतिकालिनम" गाण्यात विशेष उपस्थिती
2019 भरत सुसान हिंदी
बाटला हाऊस हुमा / व्हिक्टोरिया हिंदी
मरजावां स्वतः हिंदी "एक तो कम जिंदगानी" गाण्यात विशेष उपस्थिती
२०२० स्ट्रीट डान्सर 3 डी मिया हिंदी
2021 भुज: द प्राईड ऑफ इंडिया हिना रहमान/हेर हिंदी डिस्ने+ हॉटस्टार वर रिलीज झाले
सत्यमेव जयते 2 हिंदी विशेष उपस्थिती

दूरचित्रवाहिनी

वर्ष नाव भूमिका नोंदी
२०१५-२०१६ बिग बॉस ९ स्पर्धक ५८व्या दिवशी प्रवेश केला आणि ८४ व्या दिवशी निष्कासित केले
२०१६ झलक दिखला जा ८ १० वे स्थान काढून टाकले
कॉमेडी नाइट्स बचाओ स्वतः/पाहुणे रॉकी हँडसमचा प्रचार करण्यासाठी
२०१८ एमटीव्ही ट्रोल पोलिस
टॉप मॉडेल इंडिया अतिथी मार्गदर्शक
एमटीव्ही डेटिंग इन डार्क होस्ट
२०१९ डान्स प्लस ४ स्वतः/पाहुणे विशेष कामगिरी
२०२० भारतातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना अतिथी/न्यायाधीश
२०२१ डान्स दिवाने (सीझन 3) अतिथी/न्यायाधीश विशेष कामगिरी

चित्रफीत

वर्ष गाणे गायक नोंद कंपनी
२०१७ नाह हार्डी संधू हार्डी संधू सोबत सोनी म्युझिक इंडिया
बेबी मारवाके मानेगी रफ्तार रफ्तार सोबत झी म्युझिक कंपनी
२०१८दिलबर (अरबी आवृत्ती) स्वतः, फनेअरगायक फनेअर सोबत टी-सिरीज
२०१९ पछताओगे अरिजित सिंग विकी कौशल सोबत
पेपेटा स्वतः, रेवॅनी रेवॅनी सोबत
२०२० पछताओगे असीस कौर स्वतः टी-सिरीज
नाच मेरी राणी गुरू रंधावा, निखिता गांधी गुरू रंधवा सोबत
बॉडी डांस कव्हर मेगन थी स्टॅलियन रजित देव सोबत
२०२१ छोड देंगे परंपरा टंडन
डान्स मेरी राणीगुरू रंधवा, जहरा खान [२०][२१]
२०२३ अच्छा सिला दिया बी प्रँक [२२]

संदर्भ

  1. ^ ""I had a crush on Hrithik Roshan," Nora Fatehi gets candid". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 20 April 2019. 24 February 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "5 unknown facts about 'Dilbar' girl Nora Fatehi". The Times of India (इंग्रजी भाषेत). 25 April 2019. 24 February 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Rumoured couple Nora Fatehi, Angad Bedi share the same birthday; wish each other in the sweetest way possible". टाइम्स ऑफ इंडिया. १७ फेब्रुवारी २०१७. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Bigg Boss 9 contestant Nora Fatehi dances like crazy at her birthday party". इंडियन एक्सप्रेस. २१ एप्रिल २०१६.
  5. ^ "Roar : Tigers Of The Sundarbans - Cast". roarthefilm.com. 8 January 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Make way for Moroccan model Nora Fatehi as she makes her debut with Roar". India Today (इंग्रजी भाषेत). 14 October 2014. 3 February 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "Dilbar - YouTube". www.youtube.com. 15 January 2019 रोजी पाहिले.
  8. ^ "Satyameva Jayate's "Dilbar" breaks records in India". Music Asia (इंग्रजी भाषेत). 10 July 2018. 21 July 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 July 2018 रोजी पाहिले.
  9. ^ "I'm an Indian at heart: Bigg Boss 9 contestant Nora Fatehi". The Indian Express. 9 February 2016. 3 January 2019 रोजी पाहिले.
  10. ^ Kumar, Hemanth (15 January 2017). "NTR dances like a dream: Nora Fatehi". The Times of India (इंग्रजी भाषेत). 16 February 2021 रोजी पाहिले.
  11. ^ "Nora Fatehi signed for a special song in 'Baahubali'". IBNLive. 2015-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  12. ^ Pasupulate, Karthik (15 January 2017). "Nora Fatehi to groove with Ravi Teja in Kick 2". The Times of India (इंग्रजी भाषेत). 16 February 2021 रोजी पाहिले.
  13. ^ "After grooving with Jr NTR, Noorah Fatehi to shake a leg with Ravi Teja in Kick 2?". bollywoodlife.com. 7 April 2015.
  14. ^ Tungekar, Samreen (30 September 2017). "Bigg Boss is just entertainment, shouldn't be taken so seriously: Nora Fatehi's secrets". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 16 February 2021 रोजी पाहिले.
  15. ^ "From Bigg Boss to Bollywood". The Moviean. 14 January 2018. 5 May 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 August 2020 रोजी पाहिले.
  16. ^ Ankush, Sangra (23 December 2017). "My Birthday Song Movie Wiki Cast Crew Story Poster Trailer". 17 April 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 December 2017 रोजी पाहिले.
  17. ^ IANS (6 March 2021). "Nora Fatehi is the first African-Arab female artiste to hit 1 billion mark with 'Dilbar'". Mid Day. 6 March 2021 रोजी पाहिले.
  18. ^ "Nora Fatehi Dazzles Fans With Her Performance At FIFA World Cup 2022 Final". NDTV.com. 2022-12-27 रोजी पाहिले.
  19. ^ "FIFA World Cup 2022: Nora Fatehi's sizzling performance burns the stage, watch video". The Economic Times. 2022-12-27 रोजी पाहिले.
  20. ^ "Dance Meri Rani Song Out: Nora Fatehi's Sensual Grooves And Guru Randhawa's Vocals Are A Perfect Blend For The Upbeat Track". ZEE5 (इंग्रजी भाषेत). 21 December 2021. 21 December 2021 रोजी पाहिले.
  21. ^ Roy Chowdhury, Rishita (17 December 2021). "Nora Fatehi carried around on stretcher due to mermaid costume on Dance Meri Rani sets. Video". India Today (इंग्रजी भाषेत). 14 February 2022 रोजी पाहिले.
  22. ^ "Achha Sila Diya music video: Rajkummar Rao and Nora Fatehi face off in a song about love and betrayal". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-01-19. 2023-02-02 रोजी पाहिले.

नोंदी

  1. ^ सूत्रांचा दावा आहे की तिचा जन्म मॉन्ट्रियल किंवा टोरंटोमध्ये झाला होता. तथापि, स्वत: फतेहीकडून योग्य शहराबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केली गेली नाही

बाह्य दुवे