नोबुरू काराशिमा
नोबुरू काराशिमा (२४ एप्रिल, इ.स. १९३३ - हयात ) हे जपानी इतिहासकार, तमीळ भाषेचे साहित्यिक व दक्षिण भारताचा इतिहास आणि पुरालेखविद्यावर संशोधक आहेत. काराशिमा सध्या तोक्यो विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी चेन्नईतील मद्रास विद्यापीठात संशोधन करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले होते. त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरविले गेले आहे.