Jump to content

नोन्टे फोन्टे

नोन्टे फोन्टे ही मुळात नारायण देबनाथ यांनी निर्माण केलेली मुलांच्या मासिकात क्रमश: येणारी (बंगाली भाषेतील एक कॉमिक - पट्टी होती. पुढे या पट्ट्या पुस्तकरूपात प्रकाशित झाल्या. कॉमिक पट्ट्यामध्ये असलेले कथानक एक शाळा, तिच्या वसतीगृहाचा व्यवस्थापक केल्टूदा, आणि त्यांच्या वसतीगृहातील नन्टे फन्टे नावाचा मुलगा यांच्यामध्ये घडणाऱ्या घडामोडीवर आधारलेले आहे. हे कॉमिक्स पुस्तक स्वरूपात आहेच पण पट्टीरूपात २००३ सालापासून पुन्हा सुरू झाले आहे. या कॉमिक्सवर एक ॲनिमेशन चित्रपटही बनला आहे..