नॉर्थ कॅरोलिना
नॉर्थ कॅरोलिना North Carolina | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्रजी | ||||||||||
राजधानी | रॅले | ||||||||||
मोठे शहर | शार्लट | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत २८वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,३९,५८१ किमी² | ||||||||||
- रुंदी | ३४० किमी | ||||||||||
- लांबी | ९०० किमी | ||||||||||
- % पाणी | ९.५ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत १०वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ९५,३५,४८३ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ६३.८/किमी² (अमेरिकेत १५वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $४४,६७० | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २१ नोव्हेंबर १७८९ (१२वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-NC | ||||||||||
संकेतस्थळ | www.nc.gov |
नॉर्थ कॅरोलिना (इंग्लिश: North Carolina, पर्यायी उच्चार: नॉर्थ कॅरोलायना) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले नॉर्थ कॅरोलिना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने दहाव्या क्रमांकाचे राज्य आहे.
नॉर्थ कॅरोलिनाच्या उत्तरेला व्हर्जिनिया, पूर्वेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला टेनेसी, दक्षिणेला साउथ कॅरोलिना तर नैऋत्येला जॉर्जिया ही राज्ये आहेत. नॉर्थ कॅरोलिनाची भौगोलिक रचना उंचसखल स्वरूपाची आहे. पूर्वेकडील भाग समुद्रसपाटीवर असून पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. ६,६८४ फूट उंचीवरील माउंट मिचेल हा नॉर्थ कॅरोलिनामधील डोंगर पूर्व अमेरिकेमधील सर्वात उंच स्थान आहे. रॅले ही नॉर्थ कॅरोलिनाची राजधानी, शार्लट हे सर्वात मोठे शहर तर ग्रीन्सबोरो, विन्स्टन-सेलम ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
जगातील सर्वात पहिले विमान राईट बंधूंनी नॉर्थ कॅरोलिनाच्या आउटर बँक्स ह्या भागात उडवले. अमेरिकन यादवी युद्धामध्ये नॉर्थ कॅरोलिना दक्षिणेकडील राज्यांच्या बाजूने लढला.
गेल्या अनेक शतकांपासून नॉर्थ कॅरोलिना हे अमेरिकेमधील सर्वात मोठे तंबाखू उत्पादक राज्य राहिले आहे. गेल्या काही दशकांदरम्यान शार्लट येथे मुख्यालय असणाऱ्या अनेक मोठ्या बँका, रॅले-डरहॅम परिसरामधील उच्च संशोधन व तंत्रज्ञान औग्योगिक प्रदेश तसेच पश्चिम भागातील पर्यटन स्थळे ह्यांमुळे नॉर्थ कॅरोलिनाची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करत असून सध्या अमेरिकेमध्ये ती नवव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये नॉर्थ कॅरोलिनाचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे.
गॅलरी
- राजधानीचे शहर रॅले.
- पश्चिम भागातील डोंगराळ प्रदेश.
- नॉर्थ कॅरोलिनामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- नॉर्थ कॅरोलिना राज्य संसद भवन.
- नॉर्थ कॅरोलिनाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.