Jump to content

नैऋत्य फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

नैऋत्य फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RSWआप्रविको: KRSW, एफ.ए.ए. स्थळसूचक: RSW) अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील फोर्ट मायर्स शहराजवळ असलेला विमानतळ आहे. १३,५५५ एकर जागेवर असलेला हा विमानतळ अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा (डेन्व्हर आणि डॅलास-फोर्ट वर्थ नंतर) मोठा विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. याशिवाय कॅरिबियन, उत्तर अमेरिकेतील देश व युरोपमधील काही शहरांना देखील येथून थेट सेवा आहे. सन कंट्री एरलाइन्सचा येथे तळ आहे. साउथवेस्ट एरलाइन्स, आणि डेल्टा एरलाइन्स येथील प्रमुख विमानकंपन्या आहेत.