Jump to content

नैऋत्य गारो हिल्स जिल्हा

नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

नैऋत्य गारो हिल्स जिल्हा
मेघालय राज्यातील जिल्हा
नैऋत्य गारो हिल्स जिल्हा चे स्थान
नैऋत्य गारो हिल्स जिल्हा चे स्थान
मेघालय मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमेघालय
मुख्यालयअंपती
क्षेत्रफळ
 - एकूण ८२२ चौरस किमी (३१७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,७०,७९४ (२०११)
-लोकसंख्या घनता८२२ प्रति चौरस किमी (२,१३० /चौ. मैल)
-साक्षरता दर७५%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघतुरा
-खासदारअगाथा संगमा
संकेतस्थळ


नैऋत्य गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यापासून नैऋत्य गारो हिल्स जिल्हा वेगळा करण्यात आला. नैऋत्य गारो हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या नैऋत्य भागात स्थित असून त्याच्या पश्चिम व दक्षिणेस बांगलादेशचे रंगपूरमयमनसिंह हे विभाग आहेत. २०११ साली नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.७ लाख इतकी होती. अंपती नावाचे नगर नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी गारो जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे. गारो ही येथील प्र्मुख भाषा आहे.

बाह्य दुवे